जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PM Kisan : 14 व्या हप्त्याचे पैसे हवेत ना? मग विसरु नका हे काम, उरलेय फक्त 2 दिवस

PM Kisan : 14 व्या हप्त्याचे पैसे हवेत ना? मग विसरु नका हे काम, उरलेय फक्त 2 दिवस

पीएम किसान योजना

पीएम किसान योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी सरकारने जमीन व्हेरिफिकेशन आणि ई-केवायसी अनिवार्य केलेय. ई-केवायसीची लास्ट डेट 15 जून आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

PM Kisan E-KYC : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 13 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पीएम किसानचा 14 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमीन व्हेरिफिकेशन केली आहे, त्यांनाच 14 वा हप्ता दिला जाणार आहे. पीएम किसान ई-केवायसीची लास्ट डेट 15 जून आहे. त्यामुळे, हे काम करण्यासाठी, तुमच्याकडे ई-केवायसी करण्यासाठी फक्त २ दिवस शिल्लक आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये देण्यात येते. मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते. पीएम किसान सन्मान निधीची रक्कम पती किंवा पत्नी एकालाच दिली जाते. 13वा हप्ता 8 कोटी 2 लाख शेतकर्‍यांना मिळाला असून एकूण 16,800 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

घरी बसून असे करा ई-केवायसी

-पीएम किसान वेबसाइटच्या मदतीने शेतकरी घरी बसून त्यांचा स्मार्टफोन ई-केवायसी करू शकतात. -यासाठी तुम्हाला पीएम किसान वेबसाइट http://pmkisan.gov.in वर जावे लागेल. -फार्मर कॉर्नर येथे लिहिलेले दिसेल. याच्या खाली e-KY चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. -त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागेल. -हे केल्यानंतर तुमच्या रजिस् मोबाईल नंबरवर OTP येईल. -हा ओटीपी भरताच तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

स्पेशल पुरुषांसाठी आहे LIC ची ही पॉलिसी! मिळतील जबरदस्त फायदे

PM किसान योजनेतील लाभार्थीचं नाव कसं चेक करायचं?

-PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या -बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा -मोबाइल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका. -कॅप्चा कोड टाका. -सबमिट बटणावर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात