जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PM Kisan Yojana: आज शेतकऱ्यांच्या अकाउंटवर येणार 2 हजार रुपये, तुम्हाला मिळणार का? असं करा चेक

PM Kisan Yojana: आज शेतकऱ्यांच्या अकाउंटवर येणार 2 हजार रुपये, तुम्हाला मिळणार का? असं करा चेक

पीएम किसान सन्मान निधी

पीएम किसान सन्मान निधी

PM Kisan 14th instalment latest Update: पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये टाकला जाणार आहे. पती किंवा पत्नी मधील कोणत्याही एकालाच पीएम किसान सन्मान निधीची रक्कम दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना 13 हप्ते मिळाले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 जुलै : पीएम किसान सन्मान निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता जारी करणार आहेत. ते गुरुवारी सुमारे 8.5 कोटी शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता म्हणून सुमारे 17 हजार कोटी रुपये जारी करतील. राजस्थानातील कार्यक्रमात जारी केला जाईल हप्ता राजस्थानमधील सीकर येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान पीएम किसान सन्मान योजनाची रक्कम जारी करतील. एका सरकारी निवेदनात म्हटले आहे की, पीएम किसान सन्मान निधी गुरुवारी राजस्थानमधील सीकर येथील एका कार्यक्रमात लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जाईल. निवेदनात म्हटले आहे की ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास आणि त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगदान देईल. वर्षात दिले जातात 6 हजार आज देशातील 8.5 कोटी शेतकऱ्यांना 17 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. तुम्हाला आज PM किसान योजनेचे पैसे मिळतील की नाही हे देखील तुम्ही ऑनलाइन जाणून घेऊ शकता. पीएम किसानच्या वेबसाइटवर लाभार्थी यादी (पीएम किसान लाभार्थी यादी) पाहून, पैसे तुमच्या खात्यात येतील की नाही हे कळेल. PM Kisan Scheme: लाभार्थींच्या लिस्टमध्ये नाव असुनही मिळणार नाही 14 हप्ता, पण का? ई-केवायसी आवश्यक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मिळवणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केलेय. 14वा हप्ता देखील फक्त ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच दिला जाईल. ज्या शेतकऱ्यांनी हे काम केले नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. अशी चेक करा लाभार्थ्यांची लिस्ट पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये शेतकरी त्यांचे नाव ऑनलाइन तपासू शकतात. यासाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. Business Idea:‘हा’ बिझनेस करुन होता येईल मालमाल! औषधींपासून सौंदर्य प्रसाधानासाठी आहे उपयोगी ही आहे प्रोसेस प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा. farmer corner वर क्लिक करा. नवीन पेज ओपन होईल. येथे beneficiary list ऑप्शन सिलेक्ट करा. एक फॉर्म उघडेल. यामध्ये प्रथम राज्य, नंतर जिल्ह्याचे नाव, ब्लॉक आणि गाव निवडा. सर्व माहिती भरल्यानंतर get report वर क्लिक करा. असे केल्याने तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर उघडेल. जर तुमचे नाव यादीत असेल तर तुमच्या खात्यातही पैसे येतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात