मुंबई : आपल्या देशात कोट्यवधी लोकांची जन-धन अकाउंट आहेत. नागरिकांनी देशाच्या आर्थिक रचनेत सहभागी व्हावं आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ही अकाउंट्स सुरू करण्यात आली होती. तुम्हीही जन-धन अकाउंटधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांद्वारे आतापर्यंत 25 लाख कोटी रुपये लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले आहेत. म्हणजेच देशात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. निम्म्यापेक्षा जास्त खाती महिलांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 डिजिटल बँकिंग युनिट्स (DBUs) च्या ऑनलाइन उदघाटन कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी जनगाव येथे नागरिकांना संबोधित केलं. या वेळी ते म्हणाले की, विविध कल्याणकारी योजना आणि सबसिडी अंतर्गत लाभार्थ्यांना या खात्यांद्वारे पैसे दिले जातात. इतकेच नव्हे तर या 50 कोटी जन-धन खात्यांपैकी निम्मी खाती महिलांची आहेत.
खुशखबर! दिवाळीआधी शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णयजन-धन बँक अकाउंट्समध्ये 1.75 लाख कोटी रुपये ‘सध्या गरीबांच्या जन-धन बँक अकाउंट्समध्ये 1.75 लाख कोटी रुपये जमा आहेत. ‘जन-धन खाती उघडताना लोक प्रश्न उपस्थित करत होते, की आपल्या देशात याची खरंच गरज आहे का? आज आम्ही जन-धन खात्यांद्वारे गरीब लोकांसाठी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून 25 लाख कोटी रुपये वितरित केले आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे,’ असंही केंद्रीय मंत्री रेड्डी म्हणाले.
RBI ची पुन्हा एकदा 2 सहकारी बँकांवर कारवाई, तुमची बँक तर नाही?पीएम मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये युनिट्सचं केलं उदघाटन विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील 2 डिजिटल बँकिंग युनिट्ससह एकूण 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचं उदघाटन केलं. यानंतर तुम्हाला सेव्हिंग अकाउंट उघडण्यासाठी, पासबुक प्रिंट करण्यासाठी, एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, कर्जाचा अर्ज करण्यासाठी, क्रेडिट/डेबिट कार्डचा अर्ज करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. आता तुम्हाला तुमच्या घराजवळ ही उत्तम सुविधा मिळणार आहे.
बजेटमध्ये करण्यात आली होती घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर करताना देशभरातील 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन करण्याची घोषणा केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटदरम्यान देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 75 डिजिटल बँकिंग युनिट्स सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, अनेक राज्यांमध्ये डिजिटल बँकिंग युनिट्स सुरू केली जात आहेत.