लक्ष्मण रॉय, प्रतिनिधी, नवी दिल्ली : दिवाळीआधी पुन्हा एकदा मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळाली आहे. पीएम किसान योजनेंतर्गत २००० रुपयांचा हप्ता नुकताच खात्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी पिकांच्या एमएसपी -किमान आधारभूत किंमती वाढविण्यास मान्यता देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार डाळींच्या एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढसाठी मंजुरी मिळाली आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ करण्यात आली. त्याचबरोबर मोहरीच्या एमएसपीमध्ये क्विंटलमागे 400 रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
RBI ची पुन्हा एकदा 2 सहकारी बँकांवर कारवाई, तुमची बँक तर नाही?पिक | क्विंटलमागे दरवाढ |
---|---|
मसूर | 500 रुपये प्रति क्विंटल |
मोहरी | 400 रुपये प्रति क्विंटल |
गहू | 110 रुपये प्रति क्विंटल |
ज्वारी | 100 रुपये प्रति क्विंटल |
चणा | 105 रुपये प्रति क्विंटल |
सूर्यफुल | 209 रुपये प्रति क्विंटल |
सरकार किमान आधारभूत किंमत ठरवते आणि तेवढ्या किंमतीमध्ये शेतकऱ्यांकडून पिक घेते. त्याच्या खाली शेतकऱ्यांकडून पिक घेता येत नाही. आधीच अस्मानी संकटामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढती महागाई आणि सध्याची स्थिती पाहता शेतकऱ्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.
CACP ने 3 ते 9 टक्क्यांपर्यंत MSP वाढवण्याची शिफारस केली होती. या शिफारसीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता याबाबत महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असून याबाबत घोषणा करण्यात येणार आहे.