
आयपीएलच्या 12 व्या हंगामात चेन्नईला एका धावेनं पराभूत करून मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं. मुंबईला ट्रॉफी आणि 20 कोटी रुपयांच बक्षीस मिळालं.

आठव्यांदा फायनलला पोहोचलेल्या चेन्नईला पराभवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यांना 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.

यंदाच्या हंगामात पुनरागमन केलेल्या डेव्हिड वॉर्नरने ऑरेंज कॅप जिंकली. त्याने 12 सामन्यात सर्वाधिक 692 धावा केल्या. यात एका शतकासह 8 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला 10 लाखांचे बक्षीस मिळाले.

चेन्नईचा सर्वात जास्त वयाचा खेळाडू इम्रान ताहिरने 26 विकेट घेतल्या. पर्पल कॅपचा विजेता ठरलेल्या ताहिरलासुद्धा 10 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.

यंदाच्या हंगामात सर्वात वेगवान अर्धशतक करण्याची कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला 10 लाखांचे बक्षीस मिळाले.

शेवटच्या सामन्यात पोलार्डने मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची कामगिरी केली. त्याला कॅच ऑफ द सीजन पुरस्कार देण्यात आला.

आय़पीएलच्या 12 व्या हंगामात 52 षटकार मारणाऱ्या रसेलला सुपर स्ट्राइकरचा पुरस्कार मिळाला. रसेलला हॅरियर कार मिळाली. त्याचसोबत मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून रसेलची निवड झाली.




