IPL 2019 ...म्हणून मुंबई जिंकली, सचिनने सांगितला ‘टर्निंग पॉईंट’

IPL 2019 ...म्हणून मुंबई जिंकली, सचिनने सांगितला ‘टर्निंग पॉईंट’

मुंबईने विजेतेपद मिळवल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिनने या सामन्यातील टर्निंग पॉईंट सांगितला.

  • Share this:

हैदराबाद, 12 मे: IPLच्या अंतिम थरारक सामन्यात मुंबईने चेन्नईवर एक धावाने विजय मिळवला. या विजयासह मुंबईने IPLचे विक्रमी चौथे विजेतेपद मिळवले. रविवारी हैदाबाद येथे झालेला या सामन्यात दोन्ही संघांचे पारडे जड होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईपुढे 150 धावांचे आव्हान दिले होते. पण अखेरच्या चेंडूवर मुंबईने जेतेपद मिळवले. या सामन्यात सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट कोणता ठराल हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितले आहे.

मुंबईने दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर मधल्या षटकात मुंबईने कमबॅक केले. पण दुसऱ्या बाजूला शेन वॉटसनने चेन्नईच्या आशा जिंवत ठेवल्या होत्या. वॉटसनने 80 धावांची महत्त्वाची खेळी केली. या सामन्यात मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांनी अचूक गोलंदाजी केली. अखेरच्या थरारक षटकात लशित मलिंगाने जबरदस्त कामगिरी केली. विशेष म्हणजे त्याआधी मलिंगाने एका षटकात अत्यंत खराब कामगिरी केली होती.

मुंबईने विजेतेपद मिळवल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिनने या सामन्यातील टर्निंग पॉईंट सांगितला. सामन्यात धोनीचे धावबाद होण्याचा क्षण हा टर्निंग पॉइंट ठरल्याचे सचिन म्हणाला. याच मैदानावर दोन वर्षांपूर्वी मुंबईने 129 धावांचा बचाव केल्याची आठवण सचिनने करुन दिली.

यावेळी सचिनने बुमराहचे कौतुक केले. त्याने चार षटकात केवळ 14 धावा देत दोन गडी बाद केले. इतक नव्हे तर सचिनने तो सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे देखील सांगितले.

मुंबईतील ATMमध्ये तरुणीसमोर युवकाचं हस्तमैथुन, मुलीनेच शूट केला VIDEO

First published: May 13, 2019, 7:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading