खरं की खोटं: महिलांना मिळणार शून्य टक्के व्याजदरावर 5 लाखांचे कर्ज? वाचा काय आहे सत्य

खरं की खोटं: महिलांना मिळणार शून्य टक्के व्याजदरावर 5 लाखांचे कर्ज? वाचा काय आहे  सत्य

महिलांना सरकारकडून शून्य व्याजदरावर कर्ज उपलब्ध करण्यात येत असल्याचे व्हायरल मेसेज मध्ये सांगण्यात आले आहे. पीएम धनलक्ष्मी योजना यांतर्गत कर्ज मिळत असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जून : लॉकडाऊन काळात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. व्हाट्सअ‍ॅपवर देखील बऱ्याचदा चुकीची माहिती फॉरवर्ड केली जाते. सध्या अशीच एक माहिती व्हाट्सअ‍ॅपवरून पसरत आहे. ही 'फेक' माहिती अशी आहे की, भारत सरकारची नवीन योजना आली आहे- पंतप्रधान धनलक्ष्मी योजना (PM Dhan Laxmi Yojana). ज्याअंतर्गत महिलांना सरकारकडून शून्य व्याजदरावर कर्ज उपलब्ध करण्यात येत असल्याचे या व्हायरल मेसेज मध्ये सांगण्यात आले आहे. हा व्हायरल होणारा मेसेज पूर्णपणे चुकीचा आहे. सरकारकडून असं स्पष्टीकरण देण्यात आले आहे की अशी कोणतीही योजना नाही आहे आणि कुणी या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे. या मेसेजच्या माध्यमातून तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

काय आहे फॉरवर्डेड मेसेजमध्ये?

या मेसेजमध्ये असे सांगण्यात आले आहे की, ही योजना त्या महिलांसाठी आहे ज्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि आत्मनिर्भर बनायचे आहे. अशा महिलांना 5 लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येईल.

(हे वाचा-लक्षात राहूद्या! 21 जूनला बंद राहणार SBIची ही सेवा)

गरीब आणि मध्यम वर्गातील महिला या योजनेच्या लाभार्थी असतील. या योजनेमध्ये नोंदणी करण्याकरता एक लिंक देखील देण्यात आली आहे. त्यावर योजनेसाठीचा फॉर्म असल्याचे मेसेजमध्ये सांगितले आहे. मात्र अशाप्रकारच्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

PIB Fact Check ने यासंदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले आहे की, सरकारची अशी कोणती योजना नाही आहे. पीआबी (Press Information Bureau) अशी संस्था आहे जी भारत सरकारचे विविध कार्यक्रम आणि उपलब्धतेच्या बाबतीत वर्तमानपत्र तसंच इलेक्ट्रॉनिक मीडियासा सूचित करते.

पीआबीची सूचना

कोरोनाच्या संकटकाळात देशामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. अशावेळी याप्रकारच्या फेक न्यूज किंवा समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या बातम्या वेगाने पसरतात.

(हे वाचा-58 दिवसात कमावले 168,818 कोटी; चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले- 'वचन केलं पूर्ण)

त्यामुळे सोशल मीडियावर पसरणारी प्रत्येक गोष्ट खरी आहे, अशी मानण्याची चूक करू नका. ती बातमी तपासून मग त्यावर विश्वास ठेवा. खासकरून असे दावे करणाऱ्या बातम्या तर तपासूनच घ्या.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: June 19, 2020, 4:03 PM IST
Tags: fake news

ताज्या बातम्या