नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: तुम्हाला देखील असा मेसेज आला आहे का ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, अर्थ मंत्रालय (Finance Ministry) 1.30 लाख रुपये दर महिन्याला इमरजन्सी कॅश म्हणून वाटत आहे. तुम्हाला असा कोणता मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा, अशा कोणत्याही मेसेजेसना बळी पडू नका. सोशल मीडियावर हा मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) ने व्हायरल होणाऱ्या मेसेजची पडताळणी केली आहे. जाणून घ्या PIB ने या मेसेजबाबत काय माहिती दिली आहे PIB Fact Check ने पडताळणी केल्यानंतर हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचं म्हटलं आहे. पीआयबीने असं म्हटलं आहे अर्थ मंत्रालयाकडून अशाप्रकारे कोणताही प्लॅन बनवण्यात आलेला नाही. पीआयबीने केलं आहे हे ट्वीट पीआयबी फॅक्ट चेकने एका ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, WhatsApp मेसेजच्या माध्यमातून असा दावा केला जातोय की अर्थ मंत्रालय नागरिकांना आपात्कालीन रोख रक्कम देत आहे. या इमरजन्सी कॅशच्या स्वरुपात लोकांना सहा महिन्यासाठी 1.30 लाख रुपये दरमहा दिले जाणार आहेत.
This WhatsApp forward claiming that @FinMinIndia is providing emergency cash where recipients will receive Rs 1,30,000 per month for 6 months is #FAKE!
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 29, 2021
❌Don't believe this message
❌Don't forward such links
❌Never disclose personal information on such websites#PIBFactCheck pic.twitter.com/3okZwNHyhA
पीआयबीने दिला असा सल्ला #PIBFactCheck ने हा दावा बनावट असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने असे म्हटले आहे की, या मेसेजवर विश्वास ठेवू नका, अशा लिंक्स फॉरवर्ड करू नका आणि तुमची वैयक्तिक माहिती या वेबसाइट्सवर शेअर करू नका. अशाप्रकारच्या मेसेजची तुम्ही पडताळणी करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे कोणती योजना असेल तर याची माहिती संबंधित मंत्रालयाकडून दिली जाते. त्यामुळे अशाप्रकारे कोणता मेसेज आल्यास तुम्ही पडताळणी करण्यासाठी संबंधित मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. शिवाय पीआयबीसारख्या विश्वासार्ह प्लॅटफॉर्म्सवरुन देखील पडताळणी करू शकता. हे वाचा- SBI Alert! ग्राहकांनी हे काम करणं आवश्यक, अन्यथा करता येणार नाहीत ट्रान्झॅक्शन तुम्हीही करू शकता फॅक्टचेक जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना किंवा धोरणांबाबतच्या सत्यतेबद्दल संशय असल्यास, तुम्ही पीआयबी फॅक्ट चेककडे ते पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच मेलद्वारेही पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल. त्याशिवाय ट्वीटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि pibfactcheck@gmail.com ईमेलद्वारे संपर्क करू शकता.