मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कोरोना काळात मोदी सरकार सर्वांना देणार 4000 रुपये? WhatsApp मेसेजवर केला जातोय दावा

कोरोना काळात मोदी सरकार सर्वांना देणार 4000 रुपये? WhatsApp मेसेजवर केला जातोय दावा

WhatsApp मेसेजवर एक दावा केला जात आहे की कोरोनाच्या काळात भारत सरकार सर्वांना 4000 रुपये देणार आहे. कोरोना केअर फंड योजनेअंतर्गत हे पैसे मिळणार असल्याचा दावा केला जात आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 02 जुलै: कोरोना काळात (Coronavirus) भारत सरकारकडून (Indian Government) विविध योजना नागरिकांच्या मदतीसाठी लाँच करण्यात आल्या. काही खाजगी संस्था, व्यावसायिक यांनी देखील पुढाकार घेत अनेक गरजवंतांना मदत केली. मात्र या काळात आणखी एक प्रकार वाढला आहे तो म्हणजे लोकांची होणारी फसवणूक (Fraud). लोकांना काही आमिषं दाखवून त्यांना लुबाडलं गेल्याच्या घटना कोरोना काळात वाढल्या आहे. सोशल मीडियावर अशाप्रकारे काही मेसेज व्हायरल (Viral Message) करून लोकांची वैयक्तिक माहिती, बँकिंग डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांनतर त्यांना लुबाडण्यात येतं.

असाच एक मेसेज सध्या WhatsApp वर व्हायरल होत आहे. सरकारची संस्था असणाऱ्या पीआयबीच्या फॅक्ट चेकने (PIB Fact Check) याबाबत पडताळणी केली आहे. त्यांनी या व्हायरल मेसेज संदर्भात ट्वीट करत नागरिकांना अलर्ट केलं आहे.

व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलं आहे?

या मेसेजमध्ये असं म्हटलं आहे की, कोरोना केअर फंडमधून 4000 रुपये सर्वांना देण्यात येणार आहेत. खाली देण्यात आलेला फॉर्म भरून अर्ज करा आणि 4000 रुपये मिळवा'. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो देखील वापरण्यात आला आहे.

हे वाचा-अ‍ॅमेझॉनचे हे 5 प्रश्न जिंकून देतील 50000, जाणून घ्या काय आहेत उत्तरं

PIB Fact Check ने काये केलं ट्वीट?

पीआयबीने WhatsApp वर व्हायरल होणाऱ्या मेसेजचा फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, 'एका WhatsApp मेसेजच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की भारत सरकार कोरोना केअर फंड योजनेअंतर्गत सर्वांना 4000 रुपयांचा मदतनिधी देत आहे. #PIBFactCheck: हा दावा खोटा आहे. भारत सरकार द्वारे अशी कोणतीही योजना राबवण्यात येत नाही आहे.'

तुम्हाला अशाप्रकारे कोणता मेसेज आल्यास कसं कराल फॅक्ट चेक?

तुम्ही पीआयबीच्या https://factcheck.pib.gov.in/ याठिकाणी जाऊन फॅक्टचेक करू शकता. त्याचप्रमाणे 918799711259 या WhatsApp क्रमांकावरून किंवा pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करून तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. ही सर्व माहिती पीआयबीची अधिकृत वेबसाइट https://pib.gov.in  यावर देण्यात आली आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Modi government, Online fraud, Whatsapp, Whatsapp messages