मुंबई, 17 ऑक्टोबर: बेरोजगारीचं संकट आपल्या देशासमोर अनेक वर्षांपासून आहे. कोरोना काळातील परिस्थितीने या संकटात भरच टाकली आहे. कोरोना काळात (Coronavirus Pandemic) अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर नोकरदार वर्गातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या (Job Loss) आहेत. दरम्यान या काळात काही ठिकाणी नोकरीच्या नव्या संधी देखील (Job Opportunities) उपलब्ध झाल्या. मात्र त्याबरोबर फसवणूकही वाढली आहे. बेरोजगार वर्गाला चुकीचे मेसेज पाठवून त्यांची फसवणूक केली जात आहे. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कुणाला असा मेसेज आल्यास वेळीच सावध व्हा! केंद्र सरकारच्या प्रेस इन्फरमेशन ब्युरो या संस्थेच्या फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने याबाबत लोकांना सावध केले आहे. या बनावट SMSबाबत पीआयबी फॅक्ट चेकने माहिती दिली आहे. काय आहे मेसेज? PIB Fact Check ने पोस्ट केलेल्या मेसेजनुसार हा एक फॉरवर्ड करण्यात आलेला मेसेज आहे. त्यात असं म्हटलं आहे की, ‘पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना 2021 साठी प्री-रजिस्ट्रेशन केलं जात आहे. या योजनेअंतर्गत सर्व तरुण बेरोजगारांना दरमहा 3500 रुपये देण्यात येतील. प्री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन फॉर्म भरा.’ यामध्ये एक लिंक देण्यात आली असून त्यावर रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरण्याचे आवाहन केले जात आहे. या मेसेजनुसार यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास तर वयाची मर्यादा 18 ते 40 वर्षे आहे. वाचा- या राज्याचे CM आहेत सर्वात महाग,योगी आदित्यनाथ की उद्धव ठाकरे कुणाचा पगार जास्त? PIB Fact Check ने काय म्हटलं? PIB Fact Check ने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार सर्व बेरोजगारांना ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजने’अंतर्गत 3500 दरमहा देत आहे. भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही. कोणत्याही संशयास्पद दुव्यावर क्लिक करू नका हा फसवणुकीचा प्रयत्न असू शकतो.
वायरल मैसेज में दावा किया गया है कि भारत सरकार 'प्रधानमत्री बेरोजगार भत्ता योजना' के तहत सभी बेरोजगारों को ₹3500 प्रति माह दे रही है#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 16, 2021
▶️ भारत सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है
▶️ किसी भी संदिग्ध लिंक पर क्लिक ना करें यह धोखाधड़ी का प्रयास हो सकता है pic.twitter.com/qwusnjkQF4
तुम्हीही करू शकता फॅक्टचेक जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना किंवा धोरणांबाबतच्या सत्यतेबद्दल संशय असल्यास, तुम्ही पीआयबी फॅक्ट चेककडे ते पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच मेलद्वारेही पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल. त्याशिवाय ट्वीटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि pibfactcheck@gmail.com ईमेलद्वारे संपर्क करू शकता.