जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पिन न टाकताच PhonePe वरुन पाठवता येतील पैसे, पण कसे?

पिन न टाकताच PhonePe वरुन पाठवता येतील पैसे, पण कसे?

PhonePe ने आपल्या अॅपवर UPI Lite फीचर लॉन्च केले आहे

PhonePe ने आपल्या अॅपवर UPI Lite फीचर लॉन्च केले आहे

PhonePe UPI Lite: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फोनपेने आपल्या अॅपवर UPI लाइट फीचर लॉन्च केलंय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 मे: फोन पेने आपल्या अ‍ॅपवर UPI Lite फीचर लॉन्च केले आहे. तुम्हाला या सुविधेचा खूप फायदा होईल. कारण यामुळे आता यूझर्स त्यांच्या UPI Lite अकाउंटवरुन पिन न टाकता फक्त एका टॅपने रु. 200 पेक्षा कमी पेमेंट करू शकतील. हे फीचर रेग्यूलरच्या UPI ट्रांझेक्शनच्या तुलनेत सोपे आणि जलद आहे. यासह, या अंतर्गत ट्रांझेक्शन फेल होण्याची शक्यता देखील कमी आहे.

News18लोकमत
News18लोकमत

यूझर्स एका सोप्या प्रोसेसने ही सुविधा त्यांच्या PhonePe अ‍ॅपवर अ‍ॅक्टिव्ह करु शकतात. ज्यामध्ये कोणत्याही KYC प्रोसेसचा समावेश नाही. तुम्ही देखील एक UPI Lite अकाउंट तयार करू शकता. यूजर्स त्यांच्या लाइट अकाउंटमध्ये रु. 2,000 पर्यंत लोड करू शकतात आणि एकावेळी 200 रुपये किंवा त्याहून कमी व्यवहार सहज करू शकतात. यासोबतच ट्रांझेक्शनची हिस्ट्री देखील तपासता येईल. PhonePe वर UPI Lite सर्व प्रमुख बँकांद्वारे समर्थित आहे आणि देशभरातील सर्व UPI व्यापारी आणि QR वर स्वीकारले जाते.

NPS मधून मॅच्योरिटीपूर्वी पैसे काढता येतात का? जाणून घ्या काय सांगतो नवा नियम

PhonePe वर UPI Lite कसे अ‍ॅक्टिव्ह करायचे?

-तुम्हाला तुमच्या PhonePe अ‍ॅपवर UPI Lite ही अ‍ॅक्टिव्ह करायचे असेल, तर त्यासाठी सर्वात आधी PhonePe अ‍ॅप उघडा. -आता अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर, यूझर्सना UPI LITE एनेबल करण्याचा ऑप्शन मिळेल. -आता यूझर्स UPI Lite मध्ये रक्कम टाका आणि नंतर बँक खाते निवडा. -यानंतर युजर्सनी UPI पिन टाकावा. आता तुमचे UPI Lite खाते यशस्वीरित्या एनेबल झाले आहे. -भारतभरातील यूझर्ससाठी डिजिटल पेमेंटचा स्वीकार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे कॅशलेस अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात