NPS मध्ये निवृत्तीपूर्वी पैसे काढण्याची तरतूद नाही. परंतु काही अटींनुसार त्यातून रक्कम काढता येते. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने एनपीएसमधून आंशिक पैसे काढण्याबाबत यावर्षी काही नियम बदलले आहेत.
1 जानेवारी 2023 पासून, NPS अकाउंट होल्डर्सला पैसे काढायचे असल्यास केंद्र, राज्य आणि केंद्रीय स्वायत्त संस्थेचे कर्मचारी, संबंधित नोडल ऑफिसरकडे आंशिक पैसे काढण्यासाठी अर्ज करावा लागेल.
आंशिक पैसे काढण्यासाठी ऑनलाइन पैसे काढण्याची परवानगी आहे. दुसरीकडे, प्रायव्हेट सेक्टरच्या NPS मेंबर्सना आंशिक पैसे काढण्याची ऑनलाइन सुविधा मिळत राहील.
PFRDA ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, NPS मधून पैसे काढण्याची वेळ मर्यादा T4 वरून T2 करण्यात आली आहे. म्हणजेच आता 4 दिवसांऐवजी फक्त 2 दिवसात पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
जर तुम्ही NPS खात्यातून पैसे काढायला गेलात तर तुम्ही फक्त तीन वेळा काढू शकता. तसेच, एकूण योगदानाच्या केवळ 25 टक्के रक्कम काढता येईल.
NPS मधून पैसे हे फक्त मुलांचे उच्च शिक्षण, मुलांचे लग्न, फ्लॅट खरेदी व बांधकाम, गंभीर आजार इत्यादींसाठी आंशिक पैसे काढता येतात.