आजच केलंत हे काम तर रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार 25 हजार रुपये

आजच केलंत हे काम तर रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार 25 हजार रुपये

तुमचं वय आता 40 वर्षं असेल आणि तुम्हाला गुंतवणूक करता आली नाही तरीही काळजी करू नका. तुम्ही रिटायरमेंटसाठी सुमारे 20 लाख रुपयांची तजवीज करू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जानेवारी : भारतात अनेक जण खाजगी क्षेत्रात (Private Sector)किंवा असंघटित क्षेत्रात काम करतात. त्यामुळे त्यांच्या पेन्शनची सोय त्यांनाच करावी लागते.

त्यांच्याकडे पेन्शन योजना (Pension Scheme) निवडण्याचा पर्याय असतो. त्याचवेळी सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये गुंतवणूक करणं बंधनकारक असतं.

खाजगी क्षेत्रात काम करणारे लोक 40 वर्षांनंतरच रिटायरमेंटचं प्लॅनिंग सुरू करतात. तुम्हीही हेच करत असाल तरी काळजी करू नका. 40 वर्षं पूर्ण केल्यानंतरही काही पर्याय असतात.

NPS मध्ये गुंतवणूक

तुमचं वय आता 40 वर्षं असेल आणि तुम्हाला गुंतवणूक करता आली नाही तरीही काळजी करू नका. तुम्ही रिटायरमेंटसाठी सुमारे 20 लाख रुपयांची तजवीज करू शकता. यातून EPS च्या माध्यमातून तुम्हाला पेन्शनची ठराविक रक्कम मिळेल. तुम्ही दर महिन्याला 25 हजार रुपयांची व्यवस्था केली तर NPS मध्ये गुंतवू शकता.

(हेही वाचा : ICICI बँकेने सुरू केली नवी सेवा, ATM कार्डशिवाय काढू शकता 20 हजार रुपये)

दर महिन्याला 10 हजार रुपयांची बचत करा

तुम्ही 40 वर्षांचे असताना NPS मध्ये गुंतवणूक केली तर पुढची 20 वर्षं दर महिन्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

काही ठराविक काळानंतर लम्प सम किंमत 20.61 लाख रुपये होईल. ही रक्कम मॅच्युरिटीच्या वेळी काढता येईल. पेन्शनच्या रकमेतून एकूण 40 टक्के रकमेची अॅन्युटी खरीदणं गरजेचं आहे. या गुंतवणुकीतून एकूण 20 हजार रुपयांची रक्कम मिळू शकते. रिटायरमेंटनंतर निर्धास्त राहायचं असेल तर NPS मध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही.

(हेही वाचा : हे पेमेंट वॉलेट होणार बंद, लवकरच काढून घ्या पैसे, नाहीतर बसेल गंडा)

==================================================================================

First published: January 21, 2020, 8:05 PM IST
Tags: moneynps

ताज्या बातम्या