मराठी बातम्या /बातम्या /मनी /PF संबंधी माहितीसाठी हवा UAN नंबर; तुमच्याकडे नसेल तर घरबसल्या कसा काढायचा पीएफ खात्याचा Online नंबर?

PF संबंधी माहितीसाठी हवा UAN नंबर; तुमच्याकडे नसेल तर घरबसल्या कसा काढायचा पीएफ खात्याचा Online नंबर?

तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे (EPFO) सदस्य असाल, तर UAN महत्त्वाचा. आतापर्यंत तुमचा युनिव्हर्सल अकाउंट  क्रमांक म्हणजेच यूएएन जनरेट (UAN) झाला नसेल तर ऑनलाइन अशा पद्धतीने करा.

तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे (EPFO) सदस्य असाल, तर UAN महत्त्वाचा. आतापर्यंत तुमचा युनिव्हर्सल अकाउंट क्रमांक म्हणजेच यूएएन जनरेट (UAN) झाला नसेल तर ऑनलाइन अशा पद्धतीने करा.

तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे (EPFO) सदस्य असाल, तर UAN महत्त्वाचा. आतापर्यंत तुमचा युनिव्हर्सल अकाउंट क्रमांक म्हणजेच यूएएन जनरेट (UAN) झाला नसेल तर ऑनलाइन अशा पद्धतीने करा.

    नवी दिल्ली, 3 जून : सरकारी असो वा खासगी प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी पीएफ अकाउंट  (Provident Fund) हे महत्वाचे असते. यात जमा होणारी पुंजी ही त्या कर्मचाऱ्याने सेवा निवृत्तीनंतरच्या जीवनाकरिता केलेली सोय असते. सध्या कोरोनाच्या काळात पीएफ अकाउंट  फार महत्वाचे ठरत आहे. कारण अशा आपत्कालीन प्रसंगी गरज पडल्यास कर्मचारी विनापरतावा आपल्या पीएफ अकाउंट मधून रक्कम काढू शकणार आहे. अर्थात सरकारने यासाठी परवानगी देखील दिली आहे.

    तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे (EPFO) सदस्य असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आतापर्यंत तुमचा युनिव्हर्सल अकाउंट  क्रमांक म्हणजेच यूएएन जनरेट (UAN) झाला नसेल तर तुम्ही तो अत्यंत सोप्या पध्दतीने जनरेट (Generate) करु शकता. युनिव्हर्सल अकाउंट  क्रमांक नोकरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांकरिता ईपीएफओच्यावतीने जारी केला जातो. हा क्रमांक 12 अंकी असतो. या क्रमांकामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या प्रॉव्हिडंट फंडाची माहिती मिळते. जाणून घेऊया हा क्रमांक जनरेट करण्याच्या प्रक्रियेविषयी...

    तुमच्याकडे आहे 5 रुपयांची ही नोट? घरबसल्या 30 हजार रुपये कमावण्याची संधी

    यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर गेल्यावर या 7 टप्प्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा युनिव्हर्सल अकाउंट  क्रमांक (UAN) जनरेट करु शकता.

    1)      सर्वप्रथम ईपीएफओच्या www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.

    2)      त्यानंतर our Services वर क्लिक करा. त्यानंतर For Employees वर क्लिक करा.

    3)      त्यानंतर Member UAN/Online Servicesवर क्लिक करा.

    4)      त्यानंतर Activate Your UAN ( Important Links च्या डावीकडे हा ऑप्शन असेल) वर क्लिक करा.

    तुमच्याकडे असलेली 500 ची नोट असली की नकली? RBI ने सांगितली ओळखण्याची पद्धत

    5)      आता तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती जसे की UAN, नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, कॅप्चा भरा आणि त्यानंतर Get Authorization Pin वर क्लिक करा.

    6)  OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर येईल. त्यानंतर तुम्हाला I Agree वर क्लिक करुन OTP  भरावा लागेल.

    7)      शेवटी Validate OTP and Activate UAN वर क्लिक करा.

    यूएएनचे (UAN) फायदे

    - यूएएनचा वापर करुन तुम्ही तुमच्या पीएफ खात्यावर लक्ष ठेवू शकता.

    -    एकापेक्षा अधिक पीएफ खाती असतील तर तुम्ही यूएएनचा वापर करुन सर्व खात्यांचा तपशील एकाच ठिकाणी पाहू शकता.

    -    यूएएनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंट चे पासबुक ऑनलाईन पाहू शकता.

    -    यूएएनचा वापर करुन तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम ऑनलाईन पध्दतीने काढू शकता.

    -    यूएनएच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या एका खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात भरु शकता.

    First published:

    Tags: Epfo news, Pf