मुंबई, 14 फेब्रुवारी : रिटायरमेंट फंड मॅनेजर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात ईपीएफओ (EPFO) 2021-22 या वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवींबाबत (Provident Fund Deposits) एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. ईपीएफओ पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत पीएफ व्याजदराबाबत (Interest Rate) निर्णय घेणार आहे. ' ईपीएफओची बैठक मार्चमध्ये आसाममधील गुवाहाटी (Guwahati) येथे होणार आहे. मार्चमध्ये 2021-22 या आर्थिक वर्षाचा शेवट होत असल्यानं त्यावेळी पीएफ व्याजदराचा प्रस्ताव मांडला जाईल, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री (Union Labour Minister) भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी पीटीआयला दिली.
केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT) ही केंद्रीय कामगार आणि रोजगारमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेणारी संस्था आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात, राज्य विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election Results) जाहीर झाल्यानंतर ही संस्था गुवाहाटी येथे एक वार्षिक बैठक घेणार आहे. या बैठकीमध्ये 2021-22 या आर्थिक वर्षातील पीएफ व्याजदराबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. इन्व्हेस्टमेंट बास्केटचा (Investment Basket) विस्तार करण्यासाठी नवीन उत्पादनांमध्येही गुंतवणुकीच्या शक्यता हे केंद्रीय मंडळ तपासणार आहे.
Card Protection Plan : Debit, Credit कार्ड हरवलं तरी नो टेन्शन; नुकसान झाल्यास मिळेल भरपाई
व्याज दर
ईपीएफओ बोर्डानं (EPFO Board) गेल्या वर्षी मार्चमध्ये 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याजदराच्या शिफारसीवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यापूर्वीच्या वर्षीदेखील हाच व्याजदर होता. ईपीएफओने देऊ केलेला हा व्याजदर गेल्या आठ वर्षांतील सर्वांत कमी दर होता. या व्याजदरानुसार सबस्क्रायबर्सच्या (Subscribers) खात्यांमध्ये आर्थिक वर्ष 2020-21 साठी पैसे जमा केले होते. 20 डिसेंबर रोजी एका ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, '23.59 कोटी खात्यांमध्ये आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.50 टक्के दरानं व्याज जमा करण्यात आलं आहे.' ईपीएफओकडं 6.7 कोटी अॅक्टिव्ह सबस्क्रायबर्स (Active Subscribers) आणि 6.9 लाख काँट्रिब्युटिंग इस्टॅब्लिशमेंट्स (Contributing Establishments) आहेत.
आर्थिक वर्ष 2021-22 साठी, ईपीएफओनं इक्विटीमधील गुंतवणूक (Equity Investment) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शिफारस केलेला व्याजदर हा, डेट इनव्हेस्टमेंटमधून (Debt Investment) मिळालेलं व्याज व इक्विटी गुंतवणुकीतून मिळालेल्या उत्पन्नाचा एकत्रित परिणाम असणार आहे. या शिफारशीला अर्थ मंत्रालयानं (Finance Ministry) मान्यता दिली आहे.
Gold Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर
ईपीएफओनं निश्चित केलेला पीएफ व्याजदर 2019-20 मध्ये 8.5 टक्के, 2018-19 मध्ये 8.65 टक्के आणि 2017-18 मध्ये 8.55 टक्के होता. ईपीएफओ एका वर्षात जमा झालेल्या रकमेपैकी 85 टक्के रक्कम कर्ज आणि 15 टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवतं. डेटमध्ये केलेल्या गुंतवणुकीपैकी कमीतकमी 45 टक्के आणि जास्तीतजास्त 65 टक्के रक्कम सरकारी सिक्युरिटीज आणि त्यासंबंधीच्या इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवली जाते. सध्या इक्विटीमधील गुंतवणूक ही, निफ्टी 50 आणि सेन्सेक्स 30 आणि ईटीएफची नक्कल करणार्या ईटीएफवर केंद्रित आहे. एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेड (SBI Funds Management Ltd) आणि युटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (UTI Asset Management Company) हे दोन फंड व्यवस्थापक सरकारच्या निर्गुंतवणूक योजनेस मदत करतात.
ईपीएफओकडे सध्या सुमारे 60 मिलियन अॅक्टिव्ह सबस्क्रायबर्स आहेत आणि ते 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त फंड आहे. ईपीएफओला वर्षाकाठी सरासरी 1.8 लाख कोटी रुपयांहून अधिक ठेवी मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.