मराठी बातम्या /बातम्या /मनी /PF खातेधारकांना मिळणार 1 लाखांचा फायदा, कसे काढू शकता पैसे? चेक करा

PF खातेधारकांना मिळणार 1 लाखांचा फायदा, कसे काढू शकता पैसे? चेक करा

PF Account Holders एक लाख रुपये अॅडव्हान्स काढू शकता. जर तुम्ही वर्किंग डेमध्ये अर्ज करत असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील.

PF Account Holders एक लाख रुपये अॅडव्हान्स काढू शकता. जर तुम्ही वर्किंग डेमध्ये अर्ज करत असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील.

PF Account Holders एक लाख रुपये अॅडव्हान्स काढू शकता. जर तुम्ही वर्किंग डेमध्ये अर्ज करत असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील.

मुंबई, 4 डिसेंबर : पीएफ खातेधारकांसाठी (PF Accountholders) एक आनंदाची बातमी आहे. जर पीएफ खातेधारकांना तातडीने पैशांची गरज असेल तर EPFO ​​मधून तुम्हाला एक लाख रुपयांचा फायदा मिळू शकतो (PF Withdrawal Rule) आणि तुम्हाला या पैशासाठी कोणतेही कागदपत्र देण्याचीही गरज नाही. EPFO ​​च्या वतीने पगारदार लोकांना अॅडव्हान्स क्लेमअंतर्गत (Medical Advance Claim) हे पैसे काढण्याची सुविधा दिली जात आहे.

EPFO ने म्हटले आहे की, जीवघेणा आजार झाल्यास, अनेक वेळा रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते, जेणेकरून रुग्णाचा जीव वाचू शकेल. अशा गंभीर स्थितीत रुग्णांचा खर्च भागवण्यासाठी अॅडव्हान्सची सुविधा देण्यात येत आहे.

जाणून घ्या काय आहे अट?

क्लेम करणार्‍या कर्मचार्‍याच्‍या रुग्णाला सरकारी/पब्लिक सेक्टर युनिट/CGHS पॅनेल हॉस्पिटलमध्‍ये दाखल करावे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत खासगी रुग्णालयात दाखल केले असल्यास त्याबाबतही चौकशी केली जाईल. त्यानंतरच तुम्ही मेडिकल क्लेमसाठी अर्ज भरू शकता.

Edelweiss Securities कडून गुंतवणुकीसाठी 'या' फर्मा स्टॉकची शिफारस, किती नफा होऊ शकतो?

किती फायदा होईल?

एक लाख रुपये अॅडव्हान्स काढू शकता. जर तुम्ही वर्किंग डेमध्ये अर्ज करत असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील. हे पैसे थेट कर्मचार्‍यांच्या खात्यात किंवा हॉस्पिटलमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात.

स्लिप 45 दिवसांत द्यावी लागेल

रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 45 दिवसांच्या आत मेडिकल स्लिप जमा करावी लागते. तुमचे अंतिम बिल अॅडव्हान्स रकमेसह अॅडजस्ट करत येतील.

Gold Price: लग्नसराईत सोनं खरेदी करताय? जाणून घ्या काय आहे गोल्ड रेट

पैसे कसे काढायचे

>> तुम्ही www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अॅडव्हान्स क्लेम करु शकता.

>> याशिवाय unifiedportalmem.epfindia.gov.in वरूनही अॅडव्हान्स क्लेम करता येईल.

>> येथे तुम्हाला Online Services वर क्लिक करावे लागेल.

>> आता तुम्हाला क्लेम (फॉर्म-31,19,10C आणि 10D) भरावा लागेल.

>> यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील शेवटचे 4 अंक टाकून पडताळणी करावी लागेल.

>> आता तुम्हाला Proceed for Online Claim वर क्लिक करावे लागेल.

>> ड्रॉप डाउनमधून पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म 31) निवडावा लागेल.

>> यानंतर तुम्हाला पैसे काढण्याचे कारणही द्यावे लागेल.

>> आता तुम्हाला रक्कम टाकावी लागेल आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.

>> यानंतर तुमचा पत्ता तपशील भरा.

>> Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका.

>> आता तुमचा क्लेम दाखल केला जाईल.

First published:
top videos

    Tags: Epfo news, Loan, Medical