Petrol-Diesel Rates: सामान्यांच्या खिशाला इंधनवाढीमुळे चाप, परभणीमध्ये पेट्रोलने केली शंभरी पार

Petrol-Diesel Rates: सामान्यांच्या खिशाला इंधनवाढीमुळे चाप, परभणीमध्ये पेट्रोलने केली शंभरी पार

परभणी मध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केली असून या वाढलेल्या दरामुळे परभणीकर (Petrol Price in Parbhani is more than 100 rs/L) हैराण झाले आहेत.

  • Share this:

परभणी, 20 फेब्रुवारी: परभणी मध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केली असून या वाढलेल्या दरामुळे परभणीकर (Petrol Price in Parbhani is more than 100 rs/L) हैराण झाले आहेत. एकूणच मागील काही दिवसापासून देशभरामध्ये वाढत्या पेट्रोल दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर याचा परिणाम होत आहे. परभणीमध्ये तर राज्यातील सर्वाधित दराने इंधनविक्री होते.  आज परभणीमध्ये पावर प्रीमियम पेट्रोल 101.82 रुपये प्रति लीटर तर साधं पेट्रोल 99.12 रुपये प्रति लीटर आहे. त्यामुळे परभणीकरांना मोठा फटका सहन करावा लागतो आहे.

संपूर्ण देशात गेल्या एक-दोन आठवड्यांपासून पेट्रोलचे दर वाढत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 39 पैशांनी वाढले आहेत. या वाढीनंतर दर 90.58 रुपये प्रति लीटर झाले आहेत, तर आज दिल्लीत डिझेल लीटर 37 पैशांनी वाढून 80.97  रुपये प्रति लीटर झाले आहे.

(हे वाचा-PHOTOS: पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला का भिडले? जाणून घ्या महत्त्वाची कारणं)

रोज सकाळी सहा वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता.

(हे वाचा-खोल समुद्रात पोहणाऱ्या तरुणीवर शार्कचा हल्ला; भयानक VIDEO कॅमेरात कैद)

तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. BPCL कस्टमर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर तर एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 20, 2021, 1:41 PM IST

ताज्या बातम्या