नवी दिल्ली, 27 मे: सध्या भारत देश कोरोना व्हायसर (corona Virus) च्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. तर दुसरीकडे देश तिसऱ्या लाटे (third wave)ला कशा पद्धतीनं सामोरं जायचं याचीही तयारी सुरु आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक अशी व्यवस्था करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहेत. The Indian Academy of Paediatrics नं केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. या पत्रात कोरोनाची तिसरी लाट आल्यास लहान मुलांना किती प्रभावीपणे वाचवलं जाऊ शकतं हे नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान कोविड 19 ची लागण झाल्यानंतर होणारे परिणाम हे जास्त गंभीर असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस सारखा संसर्ग होण्याचा धोका असल्याचंही इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिशियन्सचे संसर्गजन्य रोग अध्यक्ष डॉ. रविशंकर म्हणाले. सीरम करत असलेल्या सर्व्हेनुसार, कर्नाटकातील काही डॉक्टर रुग्णालयात जाऊन तिथे येणाऱ्या लहान मुलांची तपासणी करत आहेत. तसंच त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरस अँटीबॉडीज आहेत का याचीही तपासणी सुरु आहे. हेही वाचा- ‘‘माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?’’, प्रश्न विचारणाऱ्याला मुंबई पोलिसांचा हटके रिप्लाय 30 टक्के मुलांना होऊन गेला कोरोना? 30 टक्के मुलांना आधीच संसर्ग झाला असून ते त्यातून बरे झाले असल्याची माहिती रविशंकर यांनी दिली. आतापर्यंत घरातल्या मोठ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कुटुंबातील मोठ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं मुलांना सहज त्याची लागण होण्याची शक्यता असल्याचं डॉ. रविशंकर यांनी सांगितलं. बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समजतं नाही आणि अशा लोकांनी या कोरोनावर मात देखील केली आहे, असंही डॉ. रविशंकर म्हणालेत. तरुण मुलांच्या फुफ्फुसांमध्ये रिसेप्टर्स (An organ) पुरेसे नसतात, त्यामुळे कोविडमुळे होणारे गंभीर नुकसान हे कमीच अपेक्षित असतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- . ..अन् मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेला अखेर दिलासा, केलेली ‘ती’ विनंती मान्य लहान मुलांमधील कोरोना धोक्यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. माईल्ड, मॉडरेट, सिवीअर अशा तीन गटांमध्ये 18 वर्षांखालील कोविड रुग्णांचं वर्गीकरण असिम्पटमेटीक आणि माईल्ड सिम्प्टम्स असलेल्या मुलांना घरीच बरे करता येऊ शकेल. कोविड बाधित लहान मुलांवर उपचार करण्यासाठी विशेष डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. मॉडरेट आणि सिव्हीअर लक्षणे असलेल्यांना रुग्णालयात दाखल करावे. घरी असलेल्या कोरोनाबाधित लहान मुलांचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल वेळोवेळी तपासावी. स्थानिक पातळीवर कोविड सेंटरमध्ये चाईल्ड बेड तयार करावे. या संपूर्ण काळात लहान मुलांच्या मानसिकतेची काळजी घेणंही तेवढचं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.