मराठी बातम्या /बातम्या /मनी /

वयाच्या 60व्या वर्षी 2 कोटी रुपये हवे असतील, तर दरमहा किती रुपयांची SIP करावी? वाचा सविस्तर

वयाच्या 60व्या वर्षी 2 कोटी रुपये हवे असतील, तर दरमहा किती रुपयांची SIP करावी? वाचा सविस्तर

आपल्याला अपेक्षित आर्थिक उद्दिष्टं सहजपणे साध्य करण्यासाठी कमी वयातच शिस्तबद्ध गुंतवणूक सुरू करणं हा यशस्वी नियोजनाचा मूलमंत्र आहे. यामुळे तुम्ही भविष्यात आर्थिकदृष्ट्या चिंतामुक्त होऊ शकता.

आपल्याला अपेक्षित आर्थिक उद्दिष्टं सहजपणे साध्य करण्यासाठी कमी वयातच शिस्तबद्ध गुंतवणूक सुरू करणं हा यशस्वी नियोजनाचा मूलमंत्र आहे. यामुळे तुम्ही भविष्यात आर्थिकदृष्ट्या चिंतामुक्त होऊ शकता.

आपल्याला अपेक्षित आर्थिक उद्दिष्टं सहजपणे साध्य करण्यासाठी कमी वयातच शिस्तबद्ध गुंतवणूक सुरू करणं हा यशस्वी नियोजनाचा मूलमंत्र आहे. यामुळे तुम्ही भविष्यात आर्थिकदृष्ट्या चिंतामुक्त होऊ शकता.

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : नोकरी संपल्यानंतर उदरनिर्वाहासाठी, तसंच मुलांचं शिक्षण, लग्न, वैद्यकीय उपचार, आकस्मिक खर्च अशा अनेक कारणांसाठी आर्थिक तरतूद करणं आवश्यक असतं. त्याकरिता प्रत्येक जण आपल्या उत्पन्नातला काही हिस्सा बचत (Savings) करत असतात; मात्र बचत म्हणजे केवळ बँक खात्यात पैसे साठवून ठेवले तर ही आर्थिक उद्दिष्टं साध्य होऊ शकत नाहीत. त्याकरिता पैसे योग्य ठिकाणी गुंतवणं म्हणजेच इन्व्हेस्टमेंट (Investment) करणं आवश्यक आहे. त्याआधी भविष्यासाठी आर्थिक उद्दिष्टं निश्चित करताना भविष्यातल्या महागाईचा दर (Inflation), आपल्या गरजा, अपेक्षा आणि आपलं उत्पन्न यांचा सखोल विचार करून आर्थिक नियोजन (Financial Planning) करणं आवश्यक असतं. अर्थातच आपल्याला अपेक्षित आर्थिक उद्दिष्टं सहजपणे साध्य करण्यासाठी कमी वयातच शिस्तबद्ध गुंतवणूक सुरू करणं हा यशस्वी नियोजनाचा मूलमंत्र आहे. यामुळे तुम्ही भविष्यात आर्थिकदृष्ट्या चिंतामुक्त होऊ शकता.

आपली आर्थिक उद्दिष्टं साध्य करण्याकरिता गुंतवणूक करण्यासाठी काही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक आहे म्युच्युअल फंड (Mutual Fund). म्युच्युअल फंडात एसआयपी (SIP) म्हणजे दरमहा ठराविक रक्कम गुंतवण्याचा मार्गही उपलब्ध आहे, जो सर्वांना सहजपणे अवलंबता येतो. एसआयपीद्वारे वयाच्या 30व्या किंवा 35व्या वर्षी गुंतवणूक सुरू करून आर्थिक उद्दिष्टं गाठता येणं शक्य आहे. 'झी बिझनेस'ने याबाबतची माहिती दिली आहे.

सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत 2 कोटींचा निधी (Fund) जमा करायचा आहे, असं गृहीत धरल्यास, सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षं आणि म्युच्युअल फंडाचा अंदाजित परतावा 12 टक्के गृहीत धरून अनुक्रमे 30, 35 आणि 40 व्या वर्षांपासून गुंतवणूक सुरू केल्यास दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल, याचं गणित इथे उलगडून दाखवण्यात आलं आहे.

वाचा: सणासुदीच्या काळात या 10 बँका देताहेत स्वस्त गृहकर्ज, जाणून घ्या किती असेल EMI?

दीर्घ कालावधीत वर्षाला 15 ते 20 टक्के परतावा देणारे अनेक म्युच्युअल फंड बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी योग्य फंडांची निवड करून त्यात दीर्घ काळ गुंतवणूक करून तुम्ही एक चांगला निधी जमा करू शकता.

30 वर्षांत 2 कोटींचा निधी :

तुम्ही वयाच्या 30व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केलीत तर दरमहा 6 हजार रुपये एसआयपीत गुंतवून 30 वर्षांनंतर 2.1 कोटी रुपयांचा निधी मिळवू शकता.

25 वर्षांत 2 कोटींचा निधी :

तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केलीत तर दरमहा 10 हजार रुपये एसआयपीत गुंतवावे लागतील. 12 टक्के परताव्याने तुम्हाला 25 वर्षांनंतर 60व्या वर्षी 2 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होईल.

20 वर्षांत 2 कोटींचा निधी :

तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास तुम्हाला 20 वर्षं गुंतवणूक करता येईल. 20 वर्षांत 2 कोटींचा निधी उभा करण्यासाठी तुम्हाला दरमहा 20 हजार रुपये एसआयपीद्वारे गुंतवावे लागतील. वार्षिक 12 टक्के परतावा गृहीत धरल्यास 20 वर्षांनंतर तुम्हाला 2 कोटी रुपये मिळतील.

वाचा : नोकरीची चिंता सोडून AMUL सह सुरू करा स्वत:चा व्यवसाय, महिन्याला होईल 5 लाखांची कमाई

20 वर्षं मुदतीत सर्वांत जास्त परतावा देणारे काही म्युच्युअल फंड असे आहेत :

आयसीआयसीआय प्रू तंत्रज्ञान : 23%

निप्पॉन इंड ग्रोथ : 22%

एसबीआय मॅग्नम ग्लोबल : 21%

डीएसपी फ्लेक्सी कॅप : 20%

एसबीआय लार्ज आणि मिडकॅप : 20%

या माहितीवरून तुमच्या हे लक्षात आलं असेल, की जितकी लवकर गुंतवणूक सुरू केली जाईल तितकी गुंतवणुकीची रक्कमही कमी आहे. म्हणजेच जितकी दीर्घ काळ गुंतवणूक केली जाईल, तितका लाभ अधिक आहे. कमी वयात गुंतवणूक सुरू केल्यास गुंतवणुकीची रक्कम कमी असते. त्यामुळे नंतरच्या आयुष्यात वाढणाऱ्या जबाबदाऱ्या, खर्च यांमुळे नियमितपणे मोठी रक्कम भरण्यास येणाऱ्या अडचणींचा धोका कमी असतो. गुंतवणुकीवर परिणाम होत नाही. त्यामुळे सहजपणे आपलं आर्थिक उद्दिष्ट साध्य करता येतं. त्यामुळे चांगल्या म्युच्युअल फंडाची निवड करून लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करणं महत्त्वाचं आहे.

First published:

Tags: Investment, Money, Savings and investments