मुंबई : पेट्रोल स्वस्त झालं की गाडीची टाकी पूर्ण भरायची हे समीकरण काही आजचं नाही. पेट्रोलचे दर कमी होण्याची नागरिक अतूरतेनं वाट पाहात आहे. गेल्या दोन महिन्यात पेट्रोल डिझेलच्या दरात म्हणावे तेवढे मोठे बदल झाले नाही. मात्र आज दोन शहरांमध्ये पेट्रोलचे (Petrol-Diesel Rate ) दर कमी करण्यात आले आहेत. मुख्य शहरांमध्ये आज काय दर आहेत आणि तुम्ही तुमच्या शहरातले दर कसे झटपट पाहू शकता जाणून घेऊया.
सरकारी तेल कंपन्यांनी ठरवलेल्या दरानुसार आज सकाळी नोएडामध्ये पेट्रोल 24 पैशांनी स्वस्त झालं. आज दिल्लीमधील नागरिकांना प्रति लिटरमागे 96.76 रुपये मोजावे लागणार आहेत. डिझेल 21 पैशांनी स्वस्त झालं आहे.89.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
लखनऊमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Rate ) प्रतिलिटर 5 पैशांनी दर स्वस्त झाले आहेत. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसह देशातील चार महानगरांमध्ये कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
रोज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर येतात. रोज हे दर बदलत असतात. त्यामुळे तुम्हाला जर हे दर घरबसल्या पाहायचे असतील तर तुम्ही SMS द्वारे हे दर पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला 9224992249 किंवा 9223112222 किंवा 9222201122 नंबरवर SMS पाठवायचा आहे.
इंडियन ऑयलचे दर तुम्हाला हवे असतील तर तुमच्या शहराचा कोड (BPCL) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवायचा आहे. अशा प्रकारे लिहून पाठवलं तर तुम्हाला रोजचे दर कळू शकणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price hike