मराठी बातम्या /बातम्या /मनी /PNB Alert: बँक ग्राहकांनी 31 ऑगस्टपूर्वी करून घ्या KYC, अन्यथा खातं होईल बंद, घरबसल्या करा ‘हे’ महत्त्वपूर्ण काम

PNB Alert: बँक ग्राहकांनी 31 ऑगस्टपूर्वी करून घ्या KYC, अन्यथा खातं होईल बंद, घरबसल्या करा ‘हे’ महत्त्वपूर्ण काम

PNB Alert: बँक ग्राहकांनी 31 ऑगस्टपूर्वी करून घ्या KYC, अन्यथा खातं होईल बंद, घरबसल्या करा ‘हे’ महत्त्वपूर्ण काम

PNB Alert: बँक ग्राहकांनी 31 ऑगस्टपूर्वी करून घ्या KYC, अन्यथा खातं होईल बंद, घरबसल्या करा ‘हे’ महत्त्वपूर्ण काम

PNB Alert: पंजाब नॅशनल बँकेनं ट्विट केलं आहे की, RBIच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व ग्राहकांनी 31 ऑगस्ट 2022 पूर्वी त्यांचे KYC अपडेट करणं आवश्यक आहे. अपडेट न केल्यानं तुमच्या खात्यावरील व्यवहारांवर निर्बंध येऊ शकतात.

मुंबई, 18 ऑगस्ट: सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनं (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना KYC अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे. बँकेने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, सर्व ग्राहकांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत केवायसी करून घ्यावी. गेल्या अनेक महिन्यांपासून, बँक आपल्या ग्राहकांना KYC (know your customer) करण्याचं आवाहन करत आहे. केवायसी केल्यानं, ग्राहकांचे बँक खाते सक्रिय होईल आणि ते निधी हस्तांतरणासारख्या अनेक गोष्टी सहजपणे करू शकतील.

ट्विट करून दिली माहिती-

पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलं आणि म्हटलं की, “RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व ग्राहकांसाठी KYC अपडेट करणं अनिवार्य आहे. तुमचं खातं 31 मार्च 2022 पर्यंत KYC अपडेट झालं नसल्यास, तुम्हाला ते  31 ऑगस्ट 2022 पूर्वी तुमचं KYC अपडेट करावं लागेल. त्यासाठी ज्या शाखेत तुमचं खातं आहे, त्या शाखेशी संपर्क साधण्याचं आवाहनही बँकेनं केलं आहे. अपडेट न केल्यानं तुमच्या खात्यातील व्यवहारांवर बंदी येऊ शकते.

केवायसी म्हणजे काय?

KYC चे पूर्ण रूप म्हणजे Know Your Customer. केवायसी हे ग्राहकाची माहिती देणारं दस्तऐवज असतात. यावर ग्राहक स्वतःबद्दल सर्व आवश्यक माहिती देतात. बँकिंग क्षेत्रात दर 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी बँक आपल्या ग्राहकांना केवायसी फॉर्म भरण्यास सांगते. या केवायसी फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं नाव, बँक खाते क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि पूर्ण पत्ता भरावा लागतो. अशा प्रकारे बँकेला ग्राहकाची सर्व माहिती मिळते.

केवायसी कशी करावी?

केवायसी करणं खूप सोपं आहे. सर्वप्रथम, ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्या बँकेच्या शाखेत जा. तेथे संबंधित डेस्कवरून केवायसी फॉर्म घ्या आणि तो फॉर्म भरा. त्यात सर्व आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर सबमिट करा. KYC फॉर्म सबमिट केल्यापासून 3 दिवसात तुमचं KYC अपडेट केली जाते.

हेही वाचा- ATM मधून पैसे काढणे झाले महाग, वाचा तुमची बँक किती आकारणार चार्ज

केवायसी महत्वाची का आहे?

ग्राहक आणि वित्तीय संस्था या दोघांसाठी केवायसी अत्यंत महत्त्वाची आहे. बँकिंग संस्थेला KYC द्वारे ग्राहकाची सर्व अपडेटेड माहिती मिळत असते, तर ग्राहकाच्या खात्यातून इतर कोणीही पैशांचा व्यवहार करू शकत नाही. कारण जेव्हा जेव्हा एखादा व्यवहार होतो, तेव्हा त्याची माहिती ग्राहकांना ऑनलाइन/मेसेजद्वारे त्वरित प्राप्त होते.

घरबसल्या केवायसी कशी करायची?

तुम्ही बँकेला भेट न देता घरबसल्या तुमची केवायसी पूर्ण करू शकता. यासाठी तुम्ही तुमची डॉक्युमेंट्स बँकेला ई-मेल करू शकता. याशिवाय आधारद्वारे मोबाइलवर ओटीपी मागवून केवायसीही पूर्ण करता येईल. अनेक बँका नेट बँकिंगद्वारे केवायसी सुविधा देखील देतात. जर तुमची बँक देखील ही सुविधा देत असेल आणि तुम्ही नेट बँकिंग करत असाल तर तुम्ही घरबसल्या सहजपणे KYC पूर्ण करू शकता.

First published:

Tags: Bank services, Pnb, Pnb bank