मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Diesel Rate : छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये बदलले पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Rate : छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये बदलले पेट्रोल-डिझेलचे दर

टाकी फुल्ल करण्याआधी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासा

टाकी फुल्ल करण्याआधी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासा

टाकी फुल्ल करण्याआधी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासा

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेने उत्पादनात कपात केल्यानंतर आता कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 94.42 डॉलरपर्यंत वाढली आहे. तर WTI प्रति बॅरल 88.53 डॉलरवर पोहोचला आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. काही राज्यांमध्ये किमतीत चढ-उतार दिसून आले आहेत.

छत्तीसगडमध्ये पेट्रोल 0.40 रुपयांनी वाढून 103.58 रुपये प्रति लीटर तर डिझेल 96.55 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. गुजरातमध्ये पेट्रोल 0.21 रुपयांनी वाढून 96.42 रुपये आणि डिझेल 92.17 रुपयांनी वाढून 94.28 रुपये लिटर झालं आहे.

झारखंडमध्येही पेट्रोल 0.26 रुपयांनी वाढून 100 च्या वर म्हणजेच 100.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे.काही राज्यांमध्येही तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही.

सणासुदीच्या दिवसांत पैसा कमवायचाय?; अल्प गुंतवणूक असलेल्या काही व्यवसायांची माहिती...

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. त्यावर टॅक्स आणि एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन वॅट अशा अनेक गोष्टी लागून त्याचे भाव जास्त होत असतात. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. तुम्हाला घसबसल्याही तुमच्या शहरातील दर तपासता येऊ शकतात.

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही योजनेचा निधी; काय आहे कारण?

तुम्ही SMSद्वारे पेट्रोल डिझेलचे रोजचे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवला तर माहिती मिळू शकते. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील दर चेक करू शकता.

First published:

Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and Diesel price cut, Petrol Diesel hike