जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सणासुदीच्या दिवसांत पैसा कमवायचाय?; अल्प गुंतवणूक असलेल्या काही व्यवसायांची माहिती...

सणासुदीच्या दिवसांत पैसा कमवायचाय?; अल्प गुंतवणूक असलेल्या काही व्यवसायांची माहिती...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

उपलब्ध अल्प भांडवलात कोणता व्यवसाय सुरू करता येईल? असा विचार अनेक तरुणांच्या मनात बऱ्याचदा घोळत असतो. त्यासाठी ते विविध माध्यमातून माहितीदेखील घेत असतात. तुमच्याही मनात अशाच प्रकारचा विचार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    अलीकडच्या काळात नोकरीवर अवलंबून राहण्यापेक्षा व्यवसाय करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. छोटा-मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. उपलब्ध अल्प भांडवलात कोणता व्यवसाय सुरू करता येईल? असा विचार अनेक तरुणांच्या मनात बऱ्याचदा घोळत असतो. त्यासाठी ते विविध माध्यमातून माहितीदेखील घेत असतात. तुमच्याही मनात अशाच प्रकारचा विचार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. या कालावधीत तुम्ही अल्प भांडवलात एखादा छोटासा व्यवसाय करून चांगला नफा मिळवू शकता. या निमित्ताने तुमच्या व्यवसायाची यशस्वी सुरुवात होऊ शकते. याविषयी माहिती देणारी बातमी ‘युवर स्टोरी डॉट कॉम’ने दिली आहे. सणासुदीचा कालावधी सुरू झाला आहे. अनेक दुकानं आणि ई-कॉमर्स वेबसाईट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्स, डिस्काउंट, कॅशबॅक जाहीर करत आहेत. सणासुदीच्या काळात साहजिकच खरेदीकडे कल वाढतो. तसंच या काळात बरेच जण गिफ्टसुद्धा देतात. त्यामुळे अल्प भांडवलावर एखादा छोटा व्यवसाय करण्याची ही उत्तम संधी असते. या काळात तुम्ही अल्पावधीत चांगला नफा मिळवू शकता. लाईटच्या माळांचा व्यवसाय तुम्ही अल्प भांडवलावर व्यवसाय करू इच्छित असाल तर दसरा-दिवाळीच्या कालावधीत तोरणं, लाईटच्या माळा विकू शकता. अनेक जण घराच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारची तोरणं, लाईटच्या माळा खरेदी करतात; मात्र लाईटच्या माळांचा व्यवसाय करण्यापूर्वी तुमचे टार्गेट कस्टमर्स कोण आहेत, याचा शोध घ्या. अशा कस्टमर्सच्या मागणीनुसार लाईटच्या माळांमध्ये गुंतवणूक करून त्यांची विक्री करा. अभ्यास न करता व्यवसाय सुरू केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. ( म्हणे, ‘हा तर ब्रह्माचा अवतार’; विचित्र बाळाला पाहून सर्वांना बसला धक्का ) रांगोळीचा व्यवसाय सध्याच्या काळात हातानं रांगोळी काढण्याऐवजी बहुतांश जण रांगोळीचे नक्षीदार स्टिकर्स चिटकवण्यास प्राधान्य देत आहेत. होळी-दिवाळीसारख्या सणांना घरात रांगोळी काढली जाते. अशा स्थितीत रांगोळीचा व्यवसाय तुम्ही नक्कीच करू शकता. यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. रांगोळीच्या वैविध्यपूर्ण डिझाइन्स काढून त्याची यादी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टाकू शकता. तुमचं दुकान असेल तर तिथंदेखील तुम्ही रांगोळीचं साहित्य, स्टिकर्स विक्रीसाठी ठेवू शकता. खेळणी विक्रीचा व्यवसाय सणासुदीच्या काळात सुट्ट्या असल्याने माणसं एकमेकांच्या घरी जातात. या वेळी ती भेटवस्तू किंवा एखादं गिफ्ट देण्यासाठी खरेदी करतात. या निमित्ताने आपल्या मुलांसाठी किंवा दुसऱ्या मुलांना गिफ्ट देण्यासाठी खेळणी खरेदी केली जातात. घराच्या सजावटीसाठीदेखील वस्तूंची खरेदी होते. त्यामुळे तुम्ही खेळणी विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्ही सुरुवातीला ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. वॉल पेंटिंगचा व्यवसाय  वॉल पेंटिंगचा व्यवसाय सुरू केला, तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. सणासुदीच्या काळात घराच्या सजावटीसाठी वॉल पेंटिंग्ज खरेदी केली जातात. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला दुकानाची गरज नाही. तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय करू शकता. तसंच फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनसारख्या वेबसाईट्सवर तुम्ही स्वतः एक विक्रेता म्हणून रजिस्टर करून वस्तूंची विक्री करू शकता. तुम्हाला स्वतःला पेंटिंग्जची आवड असेल तर तुम्ही एक्सक्लुसिव्ह पेंटिंग्ज विकू शकता. तुमचं दुकान असेल तर तिथंदेखील तुम्ही पेंटिंग्ज विक्रीला ठेवू शकता. यामुळे तुमचं उत्पन्न नक्कीच वाढेल. दिवाळीत फटाक्यांचं मोठं आकर्षण असतं. तुम्ही फटाके विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. फटाक्यांमध्ये मोठं मार्जिन मिळतं. तुम्ही हा व्यवसाय केला तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकेल. फटाके विक्रीसंदर्भात प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम, कायदे आहेत. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या राज्यातले नियम आणि कायद्यांविषयी माहिती अवश्य घ्या. म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात