Home /News /money /

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढींनी त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार? काय आहे सरकारचा मास्टर प्लॅन

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढींनी त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार? काय आहे सरकारचा मास्टर प्लॅन

देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलीटर 120 रुपयांपर्यंत गेले आहेत. दिल्लीमध्ये 105, चेन्नईमध्ये 110, कोलकत्ता 115 आणि मुंबईमध्ये 120 रुपये प्रतिलीटर दरानं पेट्रोल मिळत आहे.

मुंबई, 7 एप्रिल : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol-diesel Prices) गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सातत्यानं वाढ होत आहे. याशिवाय एलपीजी सिलिंडरचे देखील (LPG Cylinder) दर वाढवण्यात आले आहेत. इंधन दरवाढीमुळे (Price Hike) सरकारला देशातील जनतेच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे. विरोधी पक्षांनी अनेक ठिकाणी पेट्राल-डिझेल दरवाढीविरोधात निदर्शनं सुरू केली आहेत. या दरवाढीच्या प्रक्रियेमधून आज काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. देशभरातील तेल कंपन्यांनी आज (7 एप्रिल 2022) पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये 6 एप्रिल रोजी असलेल्या दरांनुसारच इंधन (Fuel) मिळत आहे. दरवाढ न होण्याची ही गेल्या 17 दिवसांतील केवळ तिसरी वेळ आहे. 22 मार्चपासून देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ सुरू आहे. ही दरवाढ रोखण्यासाठी आता सरकार एक मोठा प्लॅन तयार करत असल्याची माहिती माध्यमांना मिळत आहे. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ईटी नाऊ स्वदेशला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली जाणार नाही. या दरवाढीपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं देशातील प्रमुख ऑईल मार्केटिंग कंपन्यांना (Oil Marketing Companies) काही निर्देश दिले आहेत. जर येत्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती कमी झाल्या नाहीत किंवा त्यामध्ये आणखी वाढ होत राहिली तर पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवरील एक्साईज ड्युटीमध्ये (Excise Duty) सरकारच्या वतीनं कपात केली जाणार आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींपासून जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळेल. याशिवाय, केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांनादेखील पेट्रोल-डिझेल व्हॅटमध्ये कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. खुशखबर! 'या' क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना यंदा चांगली पगारवाढ मिळणार; रिपोर्ट्समधून माहिती समोर भारतातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती सातत्यानं वाढत होत्या. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किंमती प्रतिबॅरल 130 डॉलर्सपर्यंत गेल्या होत्या. परिणामी, देशातील तेल कंपन्यांना हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागला. हा तोटा भरून काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्यानं वाढवल्या जात आहेत. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलीटर 120 रुपयांपर्यंत गेले आहेत. दिल्लीमध्ये 105, चेन्नईमध्ये 110, कोलकत्ता 115 आणि मुंबईमध्ये 120 रुपये प्रतिलीटर दरानं पेट्रोल मिळत आहे. Online Transaction करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? चिंता करु नका, 'अशा' प्रकारे मिळवता येतील पैसे पुन्हा राजधानी दिल्लीत 16 दिवसात 10 रुपयांची वाढ केंद्र सरकारनं गेल्यावर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवरील एक्ससाईज ड्युटीमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यांनीदेखील आपापल्या पातळीवर व्हॅटमध्ये कपात केली होती. 4 नोव्हेंबर 2021 नंतर जवळपास साडेचार महिने देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर एकदम स्थिर राहिले. यादरम्यान, देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकाही पार पडल्या. निवडणुका झाल्यानंतर 11 दिवसांनी म्हणजेच 22 मार्चपासून देशात इंधन दरवाढीला सुरुवात झाली. राजधानी दिल्लीमध्ये तर गेल्या 16 दिवसांमध्ये पेट्रोलच्या किमती 10 रुपयांनी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल दरवाढ रोखण्यासाठी सरकार एक मोठा प्लॅन तयार करत असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचं आता सरकारच्या प्रत्येक निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.
First published:

Tags: Petrol and diesel price, Petrol Diesel hike

पुढील बातम्या