Home /News /money /

Petrol Diesel Prices : क्रूड ऑइल 110 डॉलर पार, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Prices : क्रूड ऑइल 110 डॉलर पार, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

क्रूडच्या वाढच्या किमतीमुळे पेट्रोल-डिझेल दरावर सतत दबाव आहे. आज शनिवारी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. किमती पहिल्या स्तरावर स्थिर आहेत.

    नवी दिल्ली, 21 मे : क्रूड ऑइलच्या किंमती 110 डॉलर प्रति बॅरलच्यावर पोहोचल्या आहेत. आज शनिवारी ब्रेंट क्रूड ऑइल 112 डॉलर प्रति बॅरलवर ट्रेड करत आहे. क्रूडच्या वाढच्या किमतीमुळे पेट्रोल-डिझेल दरावर सतत दबाव आहे. आज शनिवारी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली (Petrol Diesel Prices Today) नाही. किमती पहिल्या स्तरावर स्थिर आहेत. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जर ब्रेंट क्रूडचे दर 110 डॉलरवर पोहोचल्यास कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करावी लागू शकते. याआधी कंपन्यांनी मार्च-एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 10.20 रुपये प्रति लीटरपर्यंत वाढवले होते. तेल कंपन्यांनी 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली होती. त्यादरम्यान केवळ 15 दिवसांत तब्बल 14 वेळा इंधन दर वाढवण्यात आला होता. दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर - देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर – चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर

    हे वाचा - खरं की काय? 100 रुपयांच्या टॅब्लेटवर व्यापाऱ्यांना मिळतो तब्बल 1000% हूनही अधिक नफा; वाचून बसेल धक्का

    SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या