मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Prices: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, चेक करा प्रतिलीटर किती पैसे मोजावे लागणार?

Petrol-Diesel Prices: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, चेक करा प्रतिलीटर किती पैसे मोजावे लागणार?

देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि मुंबईत 120.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 1 मे : सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Prices) नवे दर जाहीर केले. जागतिक बाजारात (Global MArket) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती स्थिर राहिल्याने आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

तेल कंपन्यांनी 6 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ केली होती. त्यानंतर गेल्या 25 दिवसांपासून किमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि मुंबईत 120.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. डीलर्सचे म्हणणे आहे की जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत सध्या स्थीर आहेत. त्याच्या किमती वाढल्या तर कंपन्या पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करू शकतात.

Post Office पेन्शन योजना ऑनलाइन, ग्राहकांना घरबसल्या उघडता येणार नवीन खातं

चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर 

>> मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर

>> दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर

>> चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर

>> कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

Akshaya Tritiya 2022: या शुभ मुहूर्तावर Google Pay वरून खरेदी-विक्री करा सोनं; सोपी आहे प्रक्रिया

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

First published:

Tags: Money, Petrol and diesel price, Petrol price hike