मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Akshaya Tritiya 2022: या शुभ मुहूर्तावर Google Pay वरून खरेदी-विक्री करा सोनं; सोपी आहे प्रक्रिया

Akshaya Tritiya 2022: या शुभ मुहूर्तावर Google Pay वरून खरेदी-विक्री करा सोनं; सोपी आहे प्रक्रिया

Akshaya Tritiya 2022: या दिवशी सोन्याचे दागिने (Buying Gold on Akshaya Tritiya) खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं (Gold) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर गुगल पेवर तुम्ही डिजिटल गोल्ड (Digital Gold) खरेदी करू शकता.

Akshaya Tritiya 2022: या दिवशी सोन्याचे दागिने (Buying Gold on Akshaya Tritiya) खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं (Gold) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर गुगल पेवर तुम्ही डिजिटल गोल्ड (Digital Gold) खरेदी करू शकता.

Akshaya Tritiya 2022: या दिवशी सोन्याचे दागिने (Buying Gold on Akshaya Tritiya) खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं (Gold) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर गुगल पेवर तुम्ही डिजिटल गोल्ड (Digital Gold) खरेदी करू शकता.

पुढे वाचा ...

मुंबई, 27 एप्रिल: हिंदू धर्मात गुढीपाडवा, दसरा अर्थात विजयादशमी, बलिप्रतिपदा आणि अक्षय्य तृतीया हे साडेतीन मुहूर्त मानले जातात. या दिवशी नव्या कामाची सुरुवात, शुभकार्य आणि नव्या वस्तूंची खरेदी केली जाते. या प्रत्येक मुहूर्ताचं खास असं वैशिष्ट्य आहे. त्यात अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2022) ही तिथी खूपच शुभ मानली जाते. या दिवशी नवीन दागिने (Buying Gold on Akshaya Tritiya) खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं (Gold) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर गुगल पेवर तुम्ही डिजिटल गोल्ड (Digital Gold) खरेदी करू शकता.

गुगल पेवरचं डिजिटल सोनं 99.99 टक्के शुद्ध असून ते 24 कॅरेट सोनं (Pure Gold) असतं. तुमचं सोनं MMTC स्वतःकडे साठवते. तुम्ही Google Pay वर फक्त काही सोप्या प्रोसेस करून ते सोनं सहज खरेदी आणि विक्री करू शकता. याची संपूर्ण प्रोसेस आणि माहिती जाणून घेऊ या.

हे वाचा-अखेर ठरलं! LIC चा IPO 4 मे रोजी होणार लाँच

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं हे धन आणि सौभाग्याचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे आपणही सोनं खरेदी करावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. सोनं खरेदी करणं हे अवघड काम नाही. कोणत्याही सोन्याच्या दुकानातून किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून ते खरेदी करता येतं. तुम्हाला जिथे स्वस्त आणि सोयीस्कर सोनं मिळतं, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. कोरोना महामारीनंतर (Covid-19 Pandemic) सोन्याची खरेदी-विक्री ऑनलाइन होऊ लागली आहे. आपल्याला मोबाइल वॉलेटमधून सहजरीत्या सोनं खरेदी करता येतं.

आता सोनेखरेदी म्हटलं की ते सोनं भौतिक स्वरूपातच असावं, असं गरजेचं नाही. सर्व काही डिजिटल होतंय, मग सोनं का नाही. सोनं डिजिटल स्वरूपात खरेदी करता येतं, तसंच ते विकतादेखील येतं. यालाच डिजिटल गोल्ड म्हणतात. प्रत्यक्षात ते सोनं दागिन्याच्या रूपात घालता येत नसलं, तरी ते एखाद्या सोनसाखळीपेक्षा जास्त फायदा मिळवून देतं. तुम्हाला डिजिटल गोल्ड विकत घ्यायचं असेल तर तुमचा मोबाइल घ्या, त्यात गुगल पे अ‍ॅप (Google Pay App) उघडा आणि पटकन सोनं खरेदी करा.

हे वाचा-मुलांच्या नावे असलेल्या PPF Account वरील व्याजावर टॅक्स लागणार का? समजून घ्या नियम

गुगल पेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही गुगल पे अ‍ॅपवरून डिजिटल सोनं खरेदी करता तेव्हा तुम्हाला 24 कॅरेट म्हणजेच 99.99 टक्के शुद्ध सोनं MMTC-PAM कडून दिलं जातं. हे सोनं डिजिटल असल्याने ते MMTC त्यांच्याजवळ ठेवते. यामध्ये संपूर्ण सुरक्षिततेची हमी दिली जाते आणि वेळेनुसार त्याचे रिटर्न्स वाढत असतात. आता तुम्ही Google Pay वरून सोनं कसं खरेदी आणि विक्री करू शकता ते जाणून घेऊ या. याविषयी TV9 ने वृत्त दिले आहे.

अशी करा सोन्याची खरेदी

>> सर्वात आधी तुमच्या फोनमधील गुगल पे उघडा.

>> New वर टॅप करा.

>> सर्च बार मध्ये ‘गोल्ड लॉकर’ लिहा आणि सर्च करा.

>> गोल्ड लॉकर वर टॅप करा.

>> ‘Buy’ वर टॅप करा. सोन्याच सध्याचा करांसहित बाजारभाव दिसेल.

>> सोन्याचा दर दिवशी बदलत राहतो. त्यामुळे तुम्ही खरेदी सुरू केल्यानंतर पाच मिनिटं तो दर लॉक होतो.

>> तुम्हाला जितक्या किमतीचं सोनं हवंय, ती रक्कम रुपयांत एंटर करा. त्यानंतर चेक मार्क टिक करा. तुमच्या सोयीची पेमेंट पद्धत निवडा.

>> पेमेंटसाठी Proceed वर टॅप करा. ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या लॉकरमध्ये सोनं जमा झालेलं दिसेल.

हे वाचा-LIC च्या 'या' पॉलिसीत दररोज जमा करा 47 रुपये, एवढ्या वर्षात मिळतील 25 लाख

अशी करता येईल सोन्याची विक्री

>> सर्वात आधी तुमच्या फोनमधील गुगल पे उघडा.

>> New वर टॅप करा.

>> सर्च बार मध्ये ‘गोल्ड लॉकर’ लिहा आणि सर्च करा.

>> गोल्ड लॉकरवर टॅप करा.

>> ‘Sale’ वर टॅप करा. सोन्याचा सध्याचा करांसहित बाजारभाव दिसेल.

>> सोन्याचा दर कायम बदलत राहतो, त्यामुळे तुम्ही विक्री सुरू केल्यानंतर 8 मिनिटं तो दर लॉक होतो.

>> तुम्हाला जितक्या किमतीचं सोनं विकायचं आहे, ती रक्कम रुपयांत एंटर करा. कमीत कमी एक रुपयाच्या सोन्याची विक्री करता येते. तुम्ही दोन लाख किंवा तुमच्या लॉकरमधल्या सोन्याची किंमत त्यापेक्षा कमी असेल तर ते विकू शकता.

>> त्यानंतर चेक मार्क टिक करा. तुमच्या सोयीची पेमेंट पद्धत निवडा. पेमेंटसाठी Proceed वर टॅप करा. ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या लॉकरमधलं सोनं विकलं गेलेलं दिसेल.

First published:

Tags: Gold, Gold price