मुंबई, 1 जून : पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या आंदोलनादरम्यान, आज म्हणजेच बुधवारी तेल विपणन कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाची किंमत वाढत असून कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर प्रति बॅरल 124 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. मात्र आज देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. तर, आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 114.38 रुपये प्रति लिटर आणि आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये 100.30 रुपये प्रति लिटर आहे. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल अजूनही 29.39 रुपयांनी स्वस्त आहे. रेल्वेने प्रवास करताना जास्तीचं सामान घेण्याआधी नियम समजून घ्या; अन्यथा दंड भरावा लागेल चार प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर » मुंबई - पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर » दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर » चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर » कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 8 आणि 6 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7.50 रुपयांनी स्वस्त झाले होते. देशातील Cryptocurrency गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली, 2-3 महिन्यात सर्वकाही होईल स्पष्ट तुमच्या शहरातील इंधनाचे दर याप्रमाणे तपासा तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज SMSद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP <डीलर कोड> 9334992249 वर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP <डीलर कोड> पाठवू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.