नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे अनेक गोष्टींवर परिणाम होत आहे. त्यामुळे लोक अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची वाट पाहत आहेत. अशा सर्वांना लवकरच दिलासादायक बातमी मिळू शकते. कमोडिटी एक्सपर्ट आणि आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी म्हटले आहे की, कच्चे तेल आणि जागतिक घटक देशातील इंधनाच्या किमती खाली येण्याचे संकेत देत आहेत. ते म्हणाले की, या सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेल 2 ते 3 रुपयांनी स्वस्त होऊ शकते.
सध्या कच्चे तेल 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. ब्रेंट क्रूड तेल आज प्रति बॅरल 90 डॉलरच्या खाली आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 85 डॉलरच्या खाली व्यवहार करत आहे. हा दर रशिया-युक्रेन युद्धापूर्वीचा आहे. 23 जानेवारी रोजी क्रूड 90 डॉलरच्या खाली होते. त्यानंतर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर भाव वाढू लागले. फेब्रुवारीमध्ये क्रूडने प्रति बॅरल 110 डॉलर पार केले होते.
रेल्वे प्रवासात विंडो तिकीट सोबत न्यायला विसरले तर काय कराल? रेल्वेचा नियम वाचा
अनुज गुप्ता यांनी सांगितले की, तेलाचा सर्वात मोठा आयातदार चीनमध्ये कोरोनाची वाढते प्रमाण, जागतिक मंदीची वाढती भीती आणि इंधनाची कमी मागणी यामुळे क्रूडच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. ही घसरण यापुढेही कायम राहू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेलही स्वस्त होऊ शकते.
महागाई देखील कमी होईल
पुढे ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले तर महागाईही कमी होईल. महागाई 7.50 ते 6.75 या पातळीच्या खाली येऊ शकते. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही ते चांगले होईल.
पर्सनल लोनचे तोटे समजून घ्या; विचारपूर्वक लोन घ्या अन्यथा पश्चाताप करावा लागू शकतो
प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
>> मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
>> दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
>> कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.