मुंबई, 18 सप्टेबर : पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहे. मात्र पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर अनेकांना परवडत नाहीत. या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे. गेल्या 3 महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 25-30 डॉलर स्वस्त झाले आहेत. कच्चे तेल सध्या प्रति बॅरल 91 डॉलरच्या आसपास आहे. मात्र तरीही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्र सरकारने शेवटच्या वेळी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यानंतर राज्यात नवीन शिंदे-फडणवीस सरकारने पेट्रोल 5 रुपयांनी तर तर डिझेल अडीच रुपयांनी कमी केलं होतं. Senior Citizen Saving Scheme: ‘या’ बचत योजनेद्वारे दरवर्षी होऊ शकते 2 लाखांची कमाई, समजून घ्या सविस्तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण ब्रेंट क्रूड ऑईल सध्या प्रति बॅरल 91 डॉलरच्या आसपास आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 80.85 डॉलरपर्यंत जाऊ शकतात. या गुणोत्तराच्या आधारे तेल कंपन्यांनी दर कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर 11 ते 12 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतात. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ITR Refund: आयकर परतावा अजून आला नाही तर काय कारणं असू शकतात? चेक करा सद्यस्थिती मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर कच्च्या तेलाच्या किमती 1 डॉलर प्रति बॅरलने वाढल्या किंवा कमी झाल्या, तर देशातील तेल कंपन्यांना एका लिटरवर 45 पैशांचा प्रभाव पडतो. त्यानुसार देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 11 ते 12 रुपयांनी घट झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.