नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : टपाल सेवांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिवस साजरा केला जातो. जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने 9 ते 16 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह आयोजित केला जातो.
पोस्ट ऑफिस (Post Office) केवळ लोकांच्या पत्त्यावर पत्रे पोहोचवण्याचेच काम करते असे नसून, ते आता लोकांच्या जीवनाचा भाग बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. टपाल विभाग लोकांच्या सुख-दु:खाच्या क्षणांमध्ये सहभागी आहे. पत्र सेवेव्यतिरिक्त पोस्ट ऑफिस इतर अनेक भूमिका बजावते. लोकांची पैशांची बचत सुरक्षित ठेवते आणि गुंतवणुकीच्याही विविध संधी उपलब्द करून दिल्या जातात. पोस्ट ऑफिस लाखो लोकांना रोजगारही देते. सुरू असलेल्या टपाल सप्ताहाच्या निमित्ताने आपण पोस्ट ऑफिसच्यामधून नवा रोजगाराचा पर्याय (Post office Saving Schemes Income Tips) काय आहे, याची माहिती घेऊया.
तुम्ही पोस्ट ऑफिसचे एजंट म्हणून काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला ना जास्त भांडवलाची गरज आहे ना कुठल्या पदवी-डिप्लोमाची. अगदी आठवी उत्तीर्ण झालेली व्यक्ती देखील पोस्ट ऑफिसची एजन्सी (Post office franchise) मिळवून काम सुरू करू शकते.
पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी (एजन्सी) घेऊन तुम्ही दरमहा 50 हजार रुपयांपर्यंत कमवू शकता. फ्रेंचाइजी घेऊन तुम्ही गावात किंवा शहरात कुठेतरी पोस्ट ऑफिसमध्ये काम करून कमाई सुरू करू शकता.
देशभरात आजही अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे पोस्ट ऑफिस उघडण्याची गरज आहे. पण, तिथे पोस्टाची सुविधा पुरवली जाऊ शकत नाही, त्यामुळे तेथील लोकांना टपाल सुविधा देण्यासाठी फ्रेंचाइजी आउटलेट उघडले जाते.
कोण पोस्ट ऑफिस फ्रँचायझी घेऊ शकतो.
हे वाचा - Miracle! डोळे, नाक आणि तोंड नसलेलं बाळ आलं जन्माला, डॉक्टरांनी सोडली होती आशा आणि मग…
कोणताही भारतीय नागरिक हे काम करू शकतो. फ्रेंचाइजी घेणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. फ्रँचायझी घेऊ इच्छिणारी व्यक्ती आठवी पास असावी. पोस्ट ऑफिस फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्ही कमिशनद्वारे पैसे कमावता. यामध्ये, तुम्ही नोंदणीकृत लेख, स्पीड पोस्ट बुकिंग, मनी ऑर्डर, रजिस्ट्री, टपाल तिकिटे, पोस्टल स्टेशनरी आणि मनीऑर्डर फॉर्म विकण्यासह पोस्टाच्या सेवा देऊन पैसे कमावू शकता.
फ्रेंचाइजी कशी मिळवायची
पोस्ट ऑफिसमध्ये दोन प्रकारच्या फ्रँचायझी आहेत. एक आउटलेट फ्रँचायझी आणि दुसरी पोस्टल एजंट फ्रँचायझी. तुम्ही या दोन फ्रँचायझीपैकी कोणतीही घेऊ शकता. या व्यतिरिक्त, एजंट जे शहरी आणि ग्रामीण भागात टपाल तिकिटे आणि स्टेशनरी घरोघरी पोहोचवतात. हे टपाल एजंट फ्रँचायझी म्हणून ओळखले जातात.
हे वाचा - T20 World Cup: अंपायरची चूक पकडली जाणार, ICC नं पहिल्यांदाच लागू केला नियम
फ्रेंचाइजीसाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्याला पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करून तो व्यवस्थित भरून द्यावा लागेल. अर्ज केल्यानंतर, फ्रँचायझीसाठी निवड झालेल्या सर्वांना पोस्ट विभागाशी करार करावा लागेल. या करारानंतर तुम्ही टपाल खात्यात पुरवलेल्या सुविधा लोकांना देण्याचे काम सुरू करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Post office, Post office facility