Home /News /money /

जगभरात क्रिप्टो ATM संख्येत वाढ, नोटा नाही तर मिळतात क्रिप्टोकरन्सी, नेमका वापर होतो कसा?

जगभरात क्रिप्टो ATM संख्येत वाढ, नोटा नाही तर मिळतात क्रिप्टोकरन्सी, नेमका वापर होतो कसा?

मुंबई, 4 जानेवारी : आजकाल जागतिक स्तरावर बाजारांमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency) रूपात अब्जावधी रुपयांचे व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे क्रिप्टो क्रेडिट कार्ड आणि क्रिप्टो एटीएम कार्डलाही (Crypto ATM card) महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ज्या प्रकारे बँकांच्या एटीएम कार्डचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे तुम्ही क्रिप्टो एटीएम कार्डचाही वापर करू शकता. या एटीएम कार्डच्या मदतीनं तुम्ही बिटकॉइनसह इतर क्रिप्टोकरन्सी मिळवू शकता; मात्र हे क्रिप्टो (बिटकॉइन) एटीएम कार्ड (Bitcoin ATM card) कसं असतं? त्याचा कुठे आणि कसा वापर करायचा, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. याबाबत अधिक माहिती देणारं वृत्त लाइव्ह हिंदुस्थाननं प्रसिद्ध केलं आहे. बिटकॉइन एटीएम कार्ड वापरकर्त्यांना फिएट मनीसह क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि एक्स्चेंज करण्याचा पर्याय देतात. हे कार्ड सामान्य एटीएम मशीनमध्ये वापरता येत नाही. कारण बिटकॉइन कार्ड्स ब्लॉकचेनच्या (Blockchain) आधारावर काम करतात. या प्रक्रियेमध्ये वापरकर्त्याच्या डिजिटल वॉलेटमध्ये (Digital wallet) क्यूआर कोडद्वारे (QR Code) क्रिप्टो पाठवले जातात. बिटकॉइन एटीएम आणि इतर क्रिप्टो एटीएम व्यवहारांसाठी इंटरनेटवर काम करणाऱ्या क्रिप्टोकरन्सी पोर्टलचाही वापर होतो. बिटकॉइन एटीएमच्या बाबतीत वापरकर्ते अगोदर त्यांची रोख रक्कम जमा करतात. मशीन या रकमेचं रोख क्रिप्टोमध्ये रूपांतर करतं आणि ते तुमच्या बिटकॉइन वॉलेटमध्ये पाठवतं. अशा प्रकारे तुम्हाला तुमची बिटकॉइन्स मिळतात. तुम्ही एकाच वेळी विविध क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे तुमची सर्व गुंतवणूक एकाच वॉलेटमध्ये सुरक्षितही राहू शकते. SBI ग्राहकांना झटका! 1 फेब्रुवारीपासून महागणार ही सेवा, द्यावे लागणार 20 रुपये + GST सुरक्षेचा विचार केल्यास, बिटकॉइन एटीएम हा बिटकॉइन्स खरेदी, एक्सचेंज किंवा विक्री करण्याचा सर्वांत सुरक्षित मार्ग आहेत. झटपट व्यवहार तुम्हाला बिटकॉइनच्या अस्थिरतेपासून संरक्षण देतात. पासवर्ड आणि टू फॅक्टर व्हेरिफिकेशनमुळे (Two factor verification) तुमचं खातं सुरक्षित राहतं. बिटकॉइन एटीएम कोणत्याही थर्ड पार्टीचा वापर करत नाहीत. तुमचा फंड सुरक्षितपणे थेट ब्लॉकचेनमध्ये जातो. जगभरात क्रिप्टो व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहून ठिकठिकाणी बिटकॉइन एटीएम इन्स्टॉल करण्यात आले आहेत. एका वृत्तानुसार, 2014मध्ये पहिल्यांदा बिटकॉइन एटीएम सुरू करण्यात आलं होतं. तेव्हा जगभरात केवळ 301 एटीएम होते. 30 डिसेंबर 2021पर्यंत, जगभरात अंदाजे 34 हजार बिटकॉईन एटीएम इन्स्टॉल केले गेले आहेत. एका वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर 2020पर्यंत ही संख्या 13 हजारांपेक्षा कमी होती. याचाच अर्थ एका वर्षात जगभरात 20 हजारांहून अधिक नवीन बिटकॉइन एटीएम इन्स्टॉल केले गेले. गेल्या वर्षी (2021) ऑगस्टमध्ये होंडुरासमध्ये पहिलं बिटकॉइन एटीएम सुरू केलं. त्यानंतर त्याचा शेजारी देश असलेल्या एल साल्वाडोरनं बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून घोषित केलं. HDFC Securities ची 'या' केमिकल स्टॉकवर नजर; 3 महिन्यात 20 टक्के कमाईचा अंदाज Coinatmradar.com या वेबसाइटच्या डेटानुसार, डिसेंबर 2021पर्यंत, जगभरात 33 हजार 896 बिटकॉइन एटीएम इन्स्टॉल केले गेले. त्यापैकी यूएसमध्ये (29 हजार 801) जगातले सर्वांत जास्त म्हणजे जवळपास 90 टक्के बिटकॉइन एटीएम आहेत. त्यानंतर कॅनडा (2133), युरोप (1384), स्पेन (168), ऑस्ट्रिया (144), स्वित्झर्लंड (137) आणि यूके (101) या देशांचा क्रमांक लागतो. भारतामध्ये अद्याप एकही बिटकॉइन एटीएम इन्स्टॉल झालेलं नाही; मात्र देशातल्या नवीन गुंतवणूकरांचा क्रिप्टोकरन्सीकडे असलेला कल पाहता भविष्यात भारतातदेखील अशी एटीएम इन्स्टॉल होऊ शकतात.
First published:

Tags: Cryptocurrency, Money

पुढील बातम्या