Home /News /money /

Petrol Diesel Prices : टॅक्स कपातीनंतर कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहे आजचा भाव

Petrol Diesel Prices : टॅक्स कपातीनंतर कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहे आजचा भाव

जागतिक बाजारात कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांवर किरकोळ किमतीत वाढ करण्याचा दबाव दिसून येत आहे. मात्र सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

    नवी दिल्ली, 26 मे : सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. केंद्राकडून एक्साइज ड्यूटी आणि राज्यांनी वॅट हटवल्यानंतर इंधन दर कमी झाला आहे. कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत पेट्रोल 9 रुपये स्वस्त तर डिझेल 7 रुपये स्वस्त झालं आहे. जागतिक बाजारात कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांवर किरकोळ किमतीत वाढ करण्याचा दबाव दिसून येत आहे. मात्र सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 115 डॉलरच्या आसपास पोहोचली आहे. जाणकारांनी या आधी जर जर कच्च्या तेलाचा भाव 110 डॉलरहून वर गेल्यास पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढू शकतो असं म्हटलं होतं. दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर - देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर – मुंबईमध्ये पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लीटर – चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर

    हे वाचा - EPFO: PPO नंबर हरवला तर थांबू शकतं तुमचं Pension, घरबसल्या असा पुन्हा मिळवा

    SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या