मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPFO: PPO नंबर हरवला तर थांबू शकतं तुमचं Pension, घरबसल्या असा पुन्हा मिळवा

EPFO: PPO नंबर हरवला तर थांबू शकतं तुमचं Pension, घरबसल्या असा पुन्हा मिळवा

EPFO कडून कोणत्याही कंपनीतून रिटायर होणाऱ्या व्यक्तीला PPO नंबर दिला जातो. याशिवाय पेन्शन मिळू शकत नाही. त्यामुळेच हा नंबर महत्त्वाचा ठरतो.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 23 मे : जर तुमचा PPO नंबर हरवला असेल, तर तुमचं पेन्शन थांबू शकतं. अशात तुम्हाला समस्या येऊ शकतात. Employee Pension Scheme अंतर्गत येणाऱ्या पेन्शन धारकांना एक यूनिक नंबर दिला जातो. या नंबरला पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर अर्थात PPO म्हणतात. याचआधारे पेन्शनर्सला रिटारयमेंटनंतर पेन्शन मिळतं.

EPFO कडून कोणत्याही कंपनीतून रिटायर होणाऱ्या व्यक्तीला PPO नंबर दिला जातो. याशिवाय पेन्शन मिळू शकत नाही. त्यामुळेच हा नंबर महत्त्वाचा ठरतो. कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून लाभार्थ्यांची ओळख होण्यासाठी पीपीओ नंबर, सॅलरी स्टेटस चेकर अशा सुविधा मिळतात. हा पीपीओ नंबर हरवला तर परत मिळवता येऊ शकतो.

कसा कराल अर्ज -

- सर्वात आधी EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा.

- आता Online Services सेक्शनमध्ये Pensioners Portal च्या पर्यायावर क्लिक करा.

- आता एक नवं पेज ओपन होईल. इथे Know Your PPO No वर क्लिक करा.

- इथे तुमच्या ज्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याचं पेन्शन येतं तो बँक अकाउंट नंबर टाका. किंवा तुम्ही तुमचा PF नंबर टाकूनही सर्च करू शकता.

- सर्व डिटेल्स भरुन सब्मिट करा.

- त्यानंतर तुमचा पीपीओ नंबर स्क्रीनवर दिसेल.

हे वाचा - 200 रुपयांच्या SIP द्वारे कसं आणि किती दिवसांत बनू शकता कोट्यधीश, समजून घ्या Calculation

12 अंकी PPO नंबर तुमच्यासाठी रेफरेन्सप्रमाणे काम करतो. याद्वारे सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसशी संपर्क केला जातो. PPO नंबर पेन्शनरच्या पासबुकमध्ये असल्याने एका बँकेतून दुसऱ्या बँकेत, ब्राँचमध्ये तुमचं अकाउंट ट्रान्सफर करणंही सोपं होतं. पेन्शनसंबंधी कोणत्याही कामाबाबत तक्रार करण्यासाठी EPFO मध्ये PPO नंबर देणं अनिवार्य असतं. पेन्शन स्टेटस पाहण्यासाठीही हा नंबर माहित असणं महत्त्वाचं आहे.

First published:

Tags: Epfo news, Pf news, PF Withdrawal