Home /News /money /

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही, तपासा आजचा दर

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही, तपासा आजचा दर

सामान्यांच्या खिशाला परवडणार नाहीत अशा पातळीवर पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price Today) दर आहेत. मात्र साधारण दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

    नवी दिल्ली, 23 डिसेंबर: सामान्यांच्या खिशाला परवडणार नाहीत अशा पातळीवर पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price Today) दर आहेत. मात्र साधारण दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Fuel Price on 23rd December) जारी केले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अर्थात पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. मुंबईच्या तुलनेत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत. दिल्लीमध्ये 1 लीटर पेट्रोलचा भाव 95.41 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. सध्या देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये मिळत आहे. याठिकाणी पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटरवर आहे. देशातील महानगरांबाबत बोलायचे झाल्यास सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल दिल्लीत मिळत आहे. हे वाचा-तुम्हालाही Professional Loan घ्यायचंय? त्याआधी महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या आजचे इंधनाचे दर
    शहर पेट्रोलचा भाव (प्रति लीटर) डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    दिल्ली 95.41 रुपये 86.67 रुपये
    मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
    चेन्नई 101.40 रुपये 91.43 रुपये
    कोलकाता 104.67 रुपये 89.79 रुपये
    श्रीगंगानगर 114.01 रुपये 98.39 रुपये
    लखनऊ 95.28 रुपये 86.80 रुपये
    पोर्ट ब्लेअर 82.96 रुपये 89.33 रुपये
    गांधीनगर 95.35 रुपये 89.33 रुपये
    अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात. हे वाचा-Radhakishan S Damani यांनी इंडिया सिमेंट्समधील हिस्सा वाढवला, शेअरमध्ये तेजी दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या