मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Diesel price today: 24 दिवस पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, कच्च्या तेलाचे दर घटूनही परिणाम नाही

Petrol Diesel price today: 24 दिवस पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, कच्च्या तेलाचे दर घटूनही परिणाम नाही

IOCL ने बुधवारी 11 ऑगस्ट रोजीचे दर जारी केले आहेत. सरकारी कंपन्यांनी सलग 24व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price Today) कोणतीही वाढ झालेली नाही.

IOCL ने बुधवारी 11 ऑगस्ट रोजीचे दर जारी केले आहेत. सरकारी कंपन्यांनी सलग 24व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price Today) कोणतीही वाढ झालेली नाही.

IOCL ने बुधवारी 11 ऑगस्ट रोजीचे दर जारी केले आहेत. सरकारी कंपन्यांनी सलग 24व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price Today) कोणतीही वाढ झालेली नाही.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: IOCL ने बुधवारी 11 ऑगस्ट रोजीचे दर जारी केले आहेत. सरकारी कंपन्यांनी सलग 24व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price Today) कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या महिनाभरात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. मात्र याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर झालेला नाही. क्रूड ऑइलच्या किंमती कमी होऊन देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेले नाहीत.

मनीकंट्रोलच्या मते, 10 ऑगस्ट रोजी इंटरनॅशनल मार्केटमध्ये ब्रेंट क्रूडचे दर 70.61 डॉलर प्रति बॅरल होते. तर WTI क्रूडचे दर 68.28 डॉलर प्रति होते. 1 जून रोजी ब्रेंट क्रूडचे दर वाढून 70 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास होते. जून अखेरपर्यंत यामध्ये आणखी वाढ झाली होती, तोपर्यंत दर 75  डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते. 6 जुलै रोजी क्रूड ऑइलचे दर 77 डॉलरच्या पार होते. दरम्यान ऑगस्टमध्ये ही किंमत कमी झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

हे वाचा-बँकांना RBI चा झटका! ATM मध्ये पैसे नसतील तर द्यावा लागेल 10000 रुपयांचा दंड

29 जुलैपासून ब्रेंट क्रूड 75 डॉलर प्रति बॅरलवरुन कमी होण्यास सुरुवात झाली. सध्या दर 70 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहेत. मात्र गेल्या 24 दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणत्याही प्रकारची घसरण झालेली नाही. IOCL च्या वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 97.45 रुपये प्रति लीटर आहेत. मे महिन्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर आता 24 दिवस पेट्रोल (Petrol Price Today) आणि डिझेलचे (Diesel Price Today) स्थिर आहेत.

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

>> दिल्ली - पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर

>> मुंबई - पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 97.45 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई - पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता - पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर

>> भोपाळ - पेट्रोल 110.20 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लीटर

हे वाचा-Work From Home करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 25% पर्यंत होणार पगारकपात

>> बंगळुरु - पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर

>> लखनऊ -पेट्रोल 98.92 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लीटर

>> पाटणा - पेट्रोल 104.25 रुपये आणि डिझेल 95.57 रुपये प्रति लीटर

>> जयपूर - पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर

>> गुरुग्राम - पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर

असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Petrol price