नवी दिल्ली, 10 मार्च : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीआधी सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Prices Today) दरात बदल केले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या असलेल्या यूपीच्या राजधानी लखनऊमध्ये आणि दिल्लीतील नोएडामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त झाले आहेत. देशातली चार महानगर मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकातामध्ये इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल दर सर्वाधिक 110 रुपये प्रति लीटर जवळपास आहे. ग्लोबल मार्केटमध्ये क्रूड 130 डॉलर प्रति बॅरल या सर्वोच्च स्तरावर पोहोचलं असूनही इंधन दर स्थिर आहे. – नोएडामध्ये पेट्रोल 95.36 रुपये प्रति लीटर आहे, एक दिवस आधी हा दर 95.73 रुपये होता. तर डिझेल 87.21 रुपये प्रति लीटरवरुन 86.87 रुपये प्रति लीटर झालं आहे. – लखनऊमध्ये पेट्रोल दर कमी होऊन 95.14 रुपये आहे. हा दर एक दिवस आधी 95.28 रुपये होता. डिझेलही 86.80 रुपये प्रति लीटरवरुन 86.68 रुपये प्रति लीटर झालं आहे. चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर – चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर
पुणे | 109.45 रुपये | 92.25 रुपये |
---|---|---|
मुंबई | 109.98 रुपये | 94.14 रुपये |
नाशिक | 109.49 रुपये | 92.29 रुपये |
नागपूर | 109.71 रुपये | 92.53 रुपये |
अहमदनगर | 110.15 रुपये | 92.92 रुपये |
औरंगाबाद | 110.38 रुपये | 93.14 रुपये |
रत्नागिरी | 110.97 रुपये | 93.68 रुपये |
रायगड | 109.48 रुपये | 92.25 रुपये |
परभणी | 112.49 रुपये | 95.17 रुपये |
पालघर | 109.75 रुपये | 92.51 रुपये |
सांगली | 110.03 रुपये | 92.83 रुपये |
कोल्हापूर | 110.09 रुपये | 92.89 रुपये |
उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका सोमवारी (Assembly Election in Five State) संपल्या. आता अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या कंपन्या येत्या काही दिवसांत प्रतिलीटर 6 रुपयांनी दर वाढवू (Petrol Diesel Price Hike) शकतात. संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार हळूहळू तेल कंपन्यांना प्रति लीटर 5 ते 6 रुपयांनी दर वाढवण्याची परवानगी देऊ शकते.
हे वाचा - ‘ही’ आर्थिक पूर्ण करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक! मार्चअखेर न केल्यास होईल नुकसान
देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.