मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'ही' आर्थिक कामं पूर्ण करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक! मार्चअखेर न केल्यास होईल मोठं नुकसान

'ही' आर्थिक कामं पूर्ण करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक! मार्चअखेर न केल्यास होईल मोठं नुकसान

तुमचीही काही महत्त्वाची कामं राहिली असतील तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या नाहीतर खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. यामध्ये बँकिंग आणि गुंतवणुकीसंदर्भातील अनेक कामं आहेत.

तुमचीही काही महत्त्वाची कामं राहिली असतील तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या नाहीतर खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. यामध्ये बँकिंग आणि गुंतवणुकीसंदर्भातील अनेक कामं आहेत.

तुमचीही काही महत्त्वाची कामं राहिली असतील तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या नाहीतर खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. यामध्ये बँकिंग आणि गुंतवणुकीसंदर्भातील अनेक कामं आहेत.

मुंबई, 09 मार्च: मार्च महिना सुरू झाला की आर्थिक वर्ष (Financial Year End) संपण्याचे वेध लागतात. त्यामुळे सगळी महत्त्वाची आर्थिक कामं या महिन्यात पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू होते. तुमचीही काही महत्त्वाची कामं राहिली असतील तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या नाहीतर खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. यामध्ये बँकिंग आणि गुंतवणुकीसंदर्भातील अनेक कामं आहेत.

1. बँक अकाउंटचं KYC (Bank Account KYC)

31 मार्च 2022 पर्यंत डिमॅट आणि बँक अकाउंट धारकांना KYC अपडेट करणं आवश्यक आहे. KYC अंतर्गत आपलं पॅनकार्ड, पत्ता, आधारकार्ड किंवा पासपोर्ट वगैरे गोष्टी अपडेट करून घ्यावात असं बँकेकडून सांगितलं जातं. त्याचबरोबर तुमचा अगदी नुकताच काढलेला फोटो अणि अन्य माहितीही मागवली जाते. नियमांनुसार जर तुमचं KYC अपडेट नसेल तर तुमचं बँक खातं बंद होऊ शकतं.

2. आधार पॅनला लिंक करा (Aadhar PAN LInk)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही जर तुम्ही पॅनकार्ड आधार कार्डला लिंक केलं नसेल तर या महिन्यातच हे काम पूर्ण करून घ्या.त्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च आहे. जर हे काम झालं नाही तर तुमचं पॅनकार्ड इनअ‍ॅक्टिव्ह होऊ शकतं. जर पॅनकार्ड अ‍ॅक्टिव्ह नसेल तर बँक तुमच्या उत्पन्नाच्या 20% दराने तुमचा टीडीएस (TDS) कापून घेईल. त्यामुळे लवकरात लवकर हे लिंक करण्याचं काम करा.

हे वाचा-Gold Price Today:सोने दर 55000 पार, चांदीचा भावही वधारला; तपासा आजचा लेटेस्ट रेट

3. फॉर्म 12B जमा करा (FORM 12B)

तुम्ही जर 1 एप्रिल 2021 च्या नंतर नोकरी बदली असेल तर आधीच्या नोकरीत कापल्या गेलेल्या TDS बद्दलची माहिती फॉर्म 12 B च्या मार्फत नव्या कंपनीला देणं आवश्यक आहे. 31 मार्चपर्यंत फॉर्म 12B जमा केला नाही तर कंपनी जास्त TDS कापू शकते. अर्थात यामुळे तुमचंच नुकसान होऊ शकतं.

4. लेट आणि रिव्हाइज्ड रिटर्न फाइल करा (Late and Revised Returns)

2019- 20 साठी उशिरा किंवा संशोधित इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीखही 31 मार्चच आहे. कोणत्याही आर्थिक वर्षात रिटर्न्स भरण्यासाठी जी मूळ मर्यादा असते ती संपल्यानंतर उशिराने म्हणजे बिलेटेड रिटर्न फाइल केला जातो. त्यासाठी करदात्याला 10 हजार रुपये दंड म्हणजे पेनल्टी भरावी लागते. तर ओरिजिनल रिटर्न फाइल करताना काही चूक झाली असेल तर रिव्हाइज्ड रिटर्न फाइल केला जातो. अधिनियम, 1961 च्या सेक्शन 139 (4) अंतर्गत बिलेटेड ITR आयकर फाईल केला जातो. तर रिव्हाइज्ड ITR सेक्शन 139 (5) अंतर्गत दाखल केला जातो. बिलेटेड रिटर्न 10 हजार रुपयांच्या लेट फीसह 31 मार्च 2021 च्या आधी जमा होणं आवश्यक आहे.

हे वाचा-ऑन कॅमेरा फक्त खाऊन महिन्यालाच 7 कोटी कमावते; असं काय आहे हिच्या VIDEOमध्ये पाहा

5. इन्कम टॅक्समधून सूट मिळवण्यासाठी गुंतवणूक (Investment)

तुम्हाला इन्कम टॅक्समधून सूट हवी असेल आणि त्यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर थोडी घाई करा. कारण 31 मार्च आधी तुम्हाला गुंतवणूक करणं आवश्यक आहे. इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80C आणि 80D अंतर्गत केल्या गेलेल्या गुंतवणुकीवर टॅक्सची सवलत मिळते. इन्कम टॅक्स अ‍ॅक्टच्या सेक्शन 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सवलत मिळू शकते.

6. PPF, NPS आणि सुकन्या अकाउंट्समध्ये कमीत कमी रक्कम जमा करा

तुमचं पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) किंवा सुकन्या समृद्धी योजना (SSY) यापैकी कोणतं अकाउंट आहे का? जर तुमचं यापैकी एखादं अकाउंट असेल आणि त्यामध्ये या आर्थिक वर्षात तुम्हाला काहीच पैसे टाकणं शक्य झालं नसेल तर 31 मार्चपूर्वी तुम्ही त्यात कमीत कमी रक्कम टाका. PPFआणि NPS किमान रक्कम टाकली नाहीत तर ही दोन्ही अकाउंट्स इनअ‍ॅक्टिव्ह होतील. आणि अकाउंट्स पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी दंड भरावा लागेल. तसंच जर तुमच्या डिमॅट अकाउंटचं KYC झालं नसेल तर डिमॅट अकाउंटही डिअ‍ॅक्टिव्हेट केलं जाईल. आणि तसं झालं तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करु शकणार नाही. शेअर्स खेरदी केल्यावर ते शेअर्स अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊ शकणार नाहीत. KYC पूर्ण केल्यानंतर आणि ते तपासल्यानंतरच ही कामं होऊ शकतील.

7. स्टॉक्स आणि इक्विटी फंड्समधून प्रॉफिट बुक करा

स्टॉक्स आणि इक्विटी ओरिएंटेड फंड्सवर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या लाँग टर्म कॅपिटल गेन्सवर आता टॅक्स लावला जातो. जर तुम्हाला कॅपिटल लाँग गेनचा फायदा मिळाला असेल तर टॅक्सची सवलत मिळवण्यासाठी हीच योग्य संधी असेल तर टॅक्सची सवलत मिळवण्यासाठी हीच योग्य संधी आहे. टॅक्समधून सूट मिळवण्याच्या दृष्टीने 31 मार्च 22 आधी याच हिशेबाने प्रॉफिट बुक करा. त्यासाठीच तुम्हाला 31मार्चआधी 1 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळवण्याच्या दृष्टीने तितके स्टॉक्स आणि इक्विटीची विक्री करणं गरजेचं आहे. हेच पैसे तुम्ही पुढच्या वर्षीच्या गुंतवणुकीसाठी पुन्हा वापरु शकता.

अर्थात विक्री आणि खरेदी करण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला ब्रोकरेज हाउसला 1% रक्कम द्यावी लागेल. म्युचअल फंड इन्व्हेस्टर्सना मात्र ही रक्कम द्यावी लागणार नाही. कारण एंट्री लोड्सवर पैसे घेतले जात नाहीत आणि फंड्स एका वर्षानंतर विकले तर एंट्री लोड लागू होत नाहीत. तुमचं आर्थिक नुकसान वाचवण्यासाठी 31 मार्च 22 ला आर्थिक वर्ष संपण्याआधी तुमची यापैकी राहिलेली कामं लवकरात लवकर पूर्ण करून घ्या.

First published:

Tags: Bank details