Home /News /money /

Petrol Diesel Prices: इंधन दरात घसरण, तपासा आजचा पेट्रोल-डिझेल भाव

Petrol Diesel Prices: इंधन दरात घसरण, तपासा आजचा पेट्रोल-डिझेल भाव

सध्या मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये लीटर आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवर वॅट 2.08 रुपये लीटर आणि डिझेलवर 1.44 रुपये लीटर कपात केली आहे.

    नवी दिल्ली, 24 मे : केंद्र सरकारने महागाईपासून काहीसा दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. त्यामुळे इंधन दरात घसरण झाली आहे. केंद्रानंतर राज्यांनीही इंधन दर कमी (Petrol - Diesel Price Today) करण्यास सुरुवात केली. सध्या मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये लीटर आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवर वॅट 2.08 रुपये लीटर आणि डिझेलवर 1.44 रुपये लीटर कपात केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केलं आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेल दर कमी झाला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 7.16 रुपये आणि डिझेलचा भाव 7.49 रुपयांनी कमी झाला आहे.

    हे वाचा - Gold Price: सोने दरात वाढ होणार की भाव घसरणार? हे 5 फॅक्टर्स ठरतील कारणीभूत

    चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर – मुंबईमध्ये पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लीटर – चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    हे वाचा - खाद्य तेलाच्या किमतीत घसरण; सोयाबिन, मोहरी, शेंगदाणा, पामोलिनच्या दरात कपात

    दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर - देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या