Home /News /money /

Petrol Diesel Prices: पुन्हा वाढू शकतो पेट्रोल-डिझेल दर? तपासा आजचा दर

Petrol Diesel Prices: पुन्हा वाढू शकतो पेट्रोल-डिझेल दर? तपासा आजचा दर

जाणकारांनी आधीच किमती वाढू शकतात याचा अंदाज वर्तवला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव 110 डॉलरच्या वर गेल्यास पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्यास सुरू होऊ शकतात.

    नवी दिल्ली, 13 मे : ग्लोबल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींदरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे रेट (Petrol-Diesel Prices Today) जारी केले आहेत. आज इंधन दरात बदल करण्यात आलेला नाही. परंतु क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतींच्या कारणामुळे कंपन्यांवर पुन्हा दबाव वाढू शकतो. जाणकारांनी आधीच किमती वाढू शकतात याचा अंदाज वर्तवला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव 110 डॉलरच्या वर गेल्यास पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्यास सुरू होऊ शकतात. तेल कंपन्यांनी 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली होती. त्यादरम्यान केवळ 15 दिवसांत तब्बल 14 वेळा इंधन दर वाढवण्यात आला होता. या 14 दिवसांत एकूण 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली होती. त्यानंतर दिल्लीत पेट्रोल 105 तर मुंबईत 120 रुपये प्रति लीटर आहे. क्रूड दर 110 डॉलरच्या खाली असल्याने भारतात इंधन दरात कोणतीही वाढ केली नसल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर – चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर - देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

    हे वाचा - Guarantee-Warranty काळात कंपनीने प्रोडक्ट दुरुस्त करण्यास नकार दिल्यास काय कराल? या दोन्हीत काय आहे फरक

    SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या