• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 14 वेळा इंधन दरवाढ, इथे तपासा तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Price Today: ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 14 वेळा इंधन दरवाढ, इथे तपासा तुमच्या शहरातील आजचा भाव

ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 14 वेळा इंधन दरवाढ झाली आहे. केवळ तीन दिवस सोडून दररोज पेट्रोल-डिझेल दर वाढले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : सरकारी तेल कंपन्यांनी आज मंगळवारी 19 ऑक्टोबर रोजी पेट्रोल-डिझेलचे नवे रेट (Petrol-Diesel Price Today) जारी केले आहेत. अनेक दिवसांनंतर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दर स्थिर आहे. याआधी सोमवारीही पेट्रोल-डिझेल दर स्थिर होते. पेट्रोल-डिझेल दरात रविवारी 35-35 पैसे प्रति लीटरची वाढ झाली होती. पेट्रोल-डिझेल दर यावेळी सर्वात रिकॉर्ड स्तरावर आहेत. IOCL च्या आज जारी झालेल्या रेटनुसार, दिल्लीत इंडियन ऑइल पंपवर पेट्रोलची 105.84 रुपये प्रति लीटरने विक्री होत आहे. तर डिझेलची 94.57 रुपये प्रति लीटरच्या दराने विक्री होत आहे. ऑक्टोबरमध्ये 4.15 रुपयांनी वाढले पेट्रोल दर - ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 14 वेळा इंधन दरवाढ झाली आहे. केवळ तीन दिवस सोडून दररोज पेट्रोल-डिझेल दर वाढले आहेत. केवळ ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल 4.15 रुपये महागलं आहे. तर डिझेल 4.70 रुपयांनी वाढलं आहे. कच्च्या तेलाचे दर 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, त्यामुळे पेट्रोल-डिझेल दर वाढ कायम आहे.

    काय सांगता! पेट्रोलपेक्षा खूप स्वस्त आहे विमानाचं इंधन... काय असतं Jet Fuel

    चार महानगरातील पेट्रोल-डिझेल भाव (Petrol Diesel Price on 19 October 2021) -

    >> दिल्लीत पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल 94.57 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 111.77 रुपये आणि डिझेल 102.52 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 103.01 रुपये आणि डिझेल 98.92 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 106.43 रुपये आणि डिझेल 97.68 रुपये प्रति लीटर देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published: