मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पेट्रोलपेक्षा खूप स्वस्त आहे विमानाचं इंधन, जाणून घ्या काय आहे नेमकं Jet Fuel

पेट्रोलपेक्षा खूप स्वस्त आहे विमानाचं इंधन, जाणून घ्या काय आहे नेमकं Jet Fuel

दिल्लीमध्ये जेट फ्युअलची किंमत 79 हजार 20 रुपये16 पैसे प्रति किलो लिटर आहे. याचाच अर्थ जेट फ्युअल फक्त 79 रुपये लिटर आहे.

दिल्लीमध्ये जेट फ्युअलची किंमत 79 हजार 20 रुपये16 पैसे प्रति किलो लिटर आहे. याचाच अर्थ जेट फ्युअल फक्त 79 रुपये लिटर आहे.

दिल्लीमध्ये जेट फ्युअलची किंमत 79 हजार 20 रुपये16 पैसे प्रति किलो लिटर आहे. याचाच अर्थ जेट फ्युअल फक्त 79 रुपये लिटर आहे.

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर: गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel Price) किंमतींमध्ये सातत्यानं वाढ सुरू आहे. सोबतच घरगुती गॅसचे देखील दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. आज (18 ऑक्टोबर), दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत105 रुपये 84 पैसे आहे तर डिझेल 94 रुपये 57 पैसे प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोलनं प्रति लीटर 111 रुपयांचा दर ओलांडला आहे. रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांच्या इंधनाचे दर इतके जास्त असताना विमानाचे दर देखील नक्कीच जास्त असतील, असा आपला अंदाज असेल. मात्र, विमानाच इंधन (Jet Fuel) रस्त्यावरील वाहनांच्या इंधनापेक्षा स्वस्त आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

दिल्लीमध्ये जेट फ्युअलची किंमत 79 हजार 20 रुपये16 पैसे प्रति किलो लिटर आहे. याचाच अर्थ जेट फ्युअल फक्त 79 रुपये लिटर आहे. विशेष म्हणजे सध्या पेट्रोल हे जेट फ्युअलपेक्षा 33 टक्क्यांनी जास्त महाग आहे. आता ही गोष्ट समजल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला असेल हे जेट फ्युअल नेमकं असतं तरी काय? (what is jet fuel) आणि त्याची किंमत पेट्रोल-डिझेलपेक्षा कमी कशी? याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया.

हेही वाचा-  स्वस्तात खरेदी करा स्वत:चं हक्काचं घर! या तारखेला Bank of Baroda करणार ई-लिलाव

जेट फ्युअल म्हणजे काय?

पहायला गेलं तर जेट फ्युअल आणि गॅसोलिन (Gasoline) या दोन्ही एकच गोष्टी आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये पेट्रोलला गॅसोलिन म्हणतात. जेट फ्युअल आणि पेट्रोल या एकच गोष्टी असून देखील तुम्ही जेट फ्युअलवर कार चालवू शकत नाहीत. कारण, जेट फ्युअल हे कच्च्या तेलाचं सर्वात मूलभूत बायप्रॉडक्ट (Byproduct) आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याचं अतिशय काटेकोरपणे नियंत्रण केलं जातं. जेट फ्युअलचे प्रामुख्यानं दोन प्रकार पडतात, जेट ए आणि जेट बी. त्यांची गुणवत्ता आणि फ्रीजिंग पॉईंटनुसार दोन प्रकारांमध्ये ही विभागणी करण्यात आलेली आहे. जेट बी इंधन प्रामुख्यानं लष्करी मोहिमा आणि अत्यंत खराब हवामान असले तर वापरलं जाते. जेट बी फ्युअल जेट ए फ्युअलपेक्षा कमी शुद्ध असतं.

कशी केली जाते जेट फ्युअलची निर्मिती?

कच्चं तेल शुद्ध करतानाच जेट फ्युअल आणि पेट्रोल वेगळ केलं जातं. त्यांच्यातील मूलभूत फरक हायड्रोकार्बनच्या प्रमाणावर आधारित आहे. पेट्रोल हा असा हायड्रोकार्बन (Hydrocarbon) आहे ज्यात कार्बनचे 7 ते 11 अणू असतात, तर जेट फ्युअलमध्ये 12 ते 15 कार्बन अणू असतात. अधिक सोप्या भाषेत सांगायच झाल्यास जेट फ्युअल रॉकेलपासून बनवलं जातं.

हेही वाचा-  Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदी दरात वाढ, तपासा आजचा भाव

जेट फ्युअल स्वस्त का असतं?

कच्च्या तेलावर प्रक्रिया करून पेट्रोल, डिझेल, जेट फ्युअल, रॉकेल आणि एलपीजी सारखी बायप्रॉडक्ट्स तयार केली जातात. देशातील पेट्रोलियम उत्पादनांवरील कर वगळता, त्यांना शुद्ध करण्याचा खर्चही ग्राहकांकडून घेतला जातो. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत जेट फ्युअलसाठी खर्च कमी येतो. परिणामी त्याची किंमत पेट्रोलपेक्षा कमी होते.

हेही वाचा-  'बेरोजगारांना दरमहा मिळणार 3500 रुपये', तुम्हालाही आला आहे का असा मेसेज?

 यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की पेट्रोल आणि जेट फ्युएलमध्ये काय फरक असतो ते. आणि हे ही स्पष्ट झालं असेल की त्यांच्या किमतींत इतकी तफावत का आहे ते.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel price