Home /News /money /

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलसाठी मोजावी लागणार इतकी किंमत, वाचा इथे

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलसाठी मोजावी लागणार इतकी किंमत, वाचा इथे

सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतीच बदल झालेला नाही. देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price Today 31th Dec 2021) आजही स्थिर आहेत.

    मुंबई, 31 डिसेंबर: सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतीच बदल झालेला नाही. देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price Today 31th Dec 2021) आजही स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरात काही पैशांनी इंधनाचे दर बदलले आहेत, अर्थात त्यात फार मोठा बदल झालेला नाही. दरम्यान पेट्रोल किमतीच्या झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. हेमंत सोरेन सरकारने राज्यात पेट्रोलच्या दरात 25 रुपयांनी (Petrol Price Slashed by 25 rupees in Jharkhand) कपात करण्याची घोषणा केली आहे. झारखंडमधील दुचाकी वाहनांना पेट्रोलवर प्रतिलीटर 25 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. हा फायदा 26 जानेवारी 2022 पासून सुरू होईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. रांचीमध्ये पेट्रोलचा दर 98.52 रुपये प्रति लीटर आहे, तर या शहरात डिझेल 91.56 रुपये प्रति लीटरवर आहे. हे वाचा-फक्त 10 रुपयात मिळणार LED बल्ब; जाणून घ्या केंद्र सरकारची Gram Ujala Yojana दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. राज्यात काय आहेत पेट्रोल-डिझलचे दर?
    शहर पेट्रोलचा भाव (प्रति लीटर) डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे 110.12 रुपये 92.89 रुपये
    मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
    नाशिक 109.79 रुपये 92.57 रुपये
    नागपूर 110.32 रुपये 93.11 रुपये
    अहमदनगर 110.52 रुपये 93.27 रुपये
    औरंगाबाद 110.38 रुपये 93.14 रुपये
    रत्नागिरी 111.54 रुपये 94.28 रुपये
    परभणी 113.13 रुपये 95.78 रुपये
    पालघर 110.26 रुपये 92.99 रुपये
    सांगली 110.46 रुपये 93.24 रुपये
    कोल्हापूर 110.53 रुपये 93.31 रुपये
    अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price, Petrol price hike

    पुढील बातम्या