नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर आज सोमवारी जारी केले. आज इंधन दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. सलग 4 दिवस 35-35 पैसे प्रति लीटर पेट्रोल-डिझेल महागलं होतं. त्यानंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडनुसार, आज इंधन दर स्थिर आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल जर 105.84 रुपये लीटर आहे. तर डिझेल 94.57 रुपये प्रति लीटर आहे. देशभरात तेलाचा दर रेकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे. IOCL नुसार, मुंबईत डिझेल आज 102.52 रुपये प्रति लीटर आहे. तर पेट्रोल 111.77 रुपये प्रति लीटरवर आहे. मागील एका आठवड्यात पेट्रोल 1.70 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल किंमतीत 1.75 रुपये प्रति लीटरची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेल किंमतीत सतत वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून इंधन दर चढाच आहे. या महिन्यात केवळ 10 दिवसांत पेट्रोल दर 2.80 रुपयांनी महागलं आहे, तर डिझेल दरात 3.30 रुपये वाढ झाली आहे. देशभरात जवळपास 26 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे.
Credit Card चा वापर सांभाळून करा, फायदा सोडाच डोक्याला हात लावायची वेळ येईल!
>> दिल्लीत पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल 94.57 रुपये प्रति लीटर » मुंबईत पेट्रोल 111.77 रुपये आणि डिझेल 102.52 रुपये प्रति लीटर » चेन्नईमध्ये पेट्रोल 103.01 रुपये आणि डिझेल 98.92 रुपये प्रति लीटर » कोलकातामध्ये पेट्रोल 106.43 रुपये आणि डिझेल 97.68 रुपये प्रति लीटर
1 लाखाच्या गुंतवणुकीत सुरु करा नवा व्यवसाय; महिन्याला होईल इतक्या लाखांचा नफा
देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.