मराठी बातम्या /बातम्या /मनी /1 लाखाच्या गुंतवणुकीत सुरु करा नवा व्यवसाय; महिन्याला होईल इतक्या लाखांचा नफा

1 लाखाच्या गुंतवणुकीत सुरु करा नवा व्यवसाय; महिन्याला होईल इतक्या लाखांचा नफा

 स्वतःचा व्यवसाय (low investment business) सुरु करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, परंतु त्यासाठी भरपूर भांडवल लागते. मात्र, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय (Starting own Business) सुरू करून अतिरिक्त उत्पन्न मिळवायचं असेल तर तुमच्याकडे कमी गुंतवणुकीत व्यवसाय (small level business ideas) सुरू करण्याची संधी (business opportunities) आहे.

पुढे वाचा ...

     मुंबई, 16 ऑक्टोबर- स्वतःचा व्यवसाय (low investment business) सुरु करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, परंतु त्यासाठी भरपूर भांडवल लागते. मात्र, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय (Starting own Business) सुरू करून अतिरिक्त उत्पन्न मिळवायचं असेल तर तुमच्याकडे कमी गुंतवणुकीत व्यवसाय (small level business ideas) सुरू करण्याची संधी (business opportunities) आहे.

    रतन टाटा यांनी गुंतवणूक केलेली आणि पुण्यातील अर्जुन देशपांडे या तरुणाने सुरू केलेली जेनेरिक आधार (Generic Aadhaar) ही स्टार्टअप कंपनी ही संधी देत आहे. या कंपनीची फ्रँचायझी (franchise business) घेऊन तुम्ही खूप पैसे कमवू शकता. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया.

    1 लाख रुपयांची गुंतवणूक

    जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय करायचा असेल, तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. जेनेरिक आधार या कंपनीची फ्रँचायझी कोणीही घेऊ शकता. ही फ्रँचायझी घेण्यासाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. ही कंपनी आपल्या पार्टनर्सना 40 टक्क्यांपर्यंत मार्जिन (Margin) देते. मोठमोठ्या औषध कंपन्याही जास्तीत जास्त 15 ते 20 टक्के मार्जिन देतात. ही कंपनी 1000 जेनेरिक औषधं दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. यावर ग्राहकांनाही तब्बल 80 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.

    याशिवाय यामध्ये एक असा फायदा आहे की, ही कंपनी दुकानांव्यतिरिक्त ऑनलाइन ऑर्डर्सही स्वीकारते. या ऑनलाइन ऑर्डर्स तुमच्या शहरातल्या असतील, तर त्या ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, उत्तर प्रदेशात या कंपनीचे अनेक रिटेलर्स फ्रँचायझी आहेत. जे महिन्याला 8 ते 10 लाखांपर्यंतची कमाई करत आहेत. अर्थातच, शहर आणि ठिकाण यांवरही कमाईचं प्रमाण अवलंबून आहे.

    (हे वाचा:महत्त्वाची बातमी! Share Market मध्ये पैसे गुंतवत असाल तर 'या' चुका ... )

    कोणाला मिळू शकते फ्रँचायझी ?

    ज्या व्यक्ती आधीपासूनच मेडिकल दुकान चालवत आहेत किंवा ज्यांना नव्याने दुकान सुरू करायचं आहे, अशा कोणालाही ही फ्रँचायझी मिळू शकते. फ्रँचायझी घेतल्यानंतर कंपनीकडून GA चा (Generic Aadhaar) ब्रँड लोगो मिळेल. तसंच, ब्रँडिंग मटेरियल, इन हाउस प्रॉडक्ट्स, इन हाउस सॉफ्टवेअरही दिले जातात. यासाठी अर्थात ड्रग लायसन्स घेणं बंधनकारक आहे.

    पुण्यातून सुरू झालेली कंपनी

    जेनेरिक आधार ही फार्मसी कंपनी अर्जुन देशपांडे (Arjun Deshpande) या युवकाने सुरू केली. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने या कंपनीचा व्यवसाय चालतो. पुण्यातून सुरू झालेल्या या कंपनीचा व्याप आता 18 राज्यांमधील 130 हून अधिक शहरांपर्यंत पोहोचला आहे. रतन टाटा यांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

    (हे वाचा:5 रुपयांचा हा शेअर पोहोचला ₹233 वर, 1 लाखाचे कमावले 42.30 लाख ... )

    फ्रँचायझी घेण्यासाठी येथे भरा फॉर्म

    तुम्हालाही या कंपनीची फ्रँचायझी घ्यायची असेल, तर सर्वात प्रथम https://genericaadhaar.com/ या अधिकृत वेबसाइटवर जा. तिथे गेल्यावर Business Opportunity हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर फ्रँचायझीसाठी ऑनलाइन फॉर्म दिसेल. याशिवाय व्यवसायासंदर्भात अधिक माहितीसाठी आणि फॉर्म भरण्यासाठी https://genericaadhaar.com/franchise-opportunities.php या लिंकवर जावे. या फॉर्ममध्ये नाव, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी यासह इतर आवश्यक माहिती भरावी, व सबमिट बटण दाबा.असा होईल तुमचा नवीन व्यवसाय सुरू जो मिळवून देईल तुम्हाला लाखो रुपयांचा नफा.

    First published:

    Tags: Money