नवी दिल्ली, 15 एप्रिल: पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती (Petrol Diesel Price) जारी करण्यात आल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज खूप दिवसांनी सामान्यांना दिलासा देत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. गेले पंधरा दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थीर ठेवल्यानंतर आज या इंधनाच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. गुरुवारी पेट्रोलचे दर 16 पैशांनी तर डिझेलचे दर 14 पैशांनी कमी झाले आहेत. या कपातीनंतर मुंबईतील पेट्रोलचे दर 96.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 87.81 रुपये प्रति लीटर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमती कमी झाल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील किंमतीवर देखील झाला आहे. गेल्या महिन्यात तीन वेळा स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल गेल्या महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर तीन वेळा कमी झाले होते. 30 मार्च रोजी पेट्रोलचे दर 22 पैसे आणि डिझेल 23 पैशांनी कमी करण्यात आले होते. याआधी 24 आणि 25 मार्च रोजी पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले होते. रोज सकाळी सहा वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात. देशातील महत्त्वाच्या शहरातील इंधनाचे दर >> दिल्लीमध्ये पेट्रोल 90.40 रुपये आणि डिझेल 80.73 रुपये प्रति लीटर आहे » मुंबईमध्ये पेट्रोल 96.83 रुपये आणि डिझेल 87.81 रुपये प्रति लीटर आहे » चेन्नईमध्ये पेट्रोल 92.43 रुपये आणि डिझेल 85.75 रुपये प्रति लीटर आहे » कोलकातामध्ये पेट्रोल 90.62 आणि डिझेल 83.61 रुपये प्रति लीटर आहे » नोएडामध्ये पेट्रोल 88.79 रुपये आणि डिझेल 81.19 रुपये प्रति लीटर आहे » बंगळुरूमध्ये पेट्रोल 93.43 रुपये आणि डिझेल 85.60 रुपये प्रति लीटर आहे » भोपाळमध्ये पेट्रोल 98.41 रुपये आणि डिझेल 88.98 रुपये प्रति लीटर आहे » चंदीगडमध्ये पेट्रोल 86.99 रुपये आणि डिझेल 80.43 रुपये प्रति लीटर आहे » पाटणामध्ये पेट्रोल 92.74 रुपये आणि डिझेल 85.97 रुपये प्रति लीटर आहे » लखनऊमध्ये पेट्रोल 88.72 रुपये आणि डिझेल 81.13 रुपये प्रति लीटर आहे अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. (हे वाचा- सोनेव्यापारात जून 2021 पासून होणार महत्त्वाचा बदल, कशी मिळेल शुद्ध सोन्याची हमी ) तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. का कमी झाले इंधनाचे दर देशांतर्गत कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील गेल्या पंधरा दिवसांच्या कच्च्या तेलाच्या सरासरी किंमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत निश्चित करतात. याशिवाय कंपन्यांना डॉलरच्या तुलनेत बदलणारे रुपयाचे मुल्य ही बाब देखील लक्षात ठेवावी लागते. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात पेट्रोल आणखी स्वस्त होऊ शकते. याचे मुख्य कारण हे आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी होणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमती. तर भारतीय रिफायनरी कंपन्यांनी इराणमधून कच्चं तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे. हे तेल भारतात आल्यानंतर इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.