जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सोने व्यापारात जून 2021 पासून होणार महत्त्वाचा बदल, कशी मिळेल शुद्ध सोन्याची हमी

सोने व्यापारात जून 2021 पासून होणार महत्त्वाचा बदल, कशी मिळेल शुद्ध सोन्याची हमी

सोने व्यापारात जून 2021 पासून होणार महत्त्वाचा बदल, कशी मिळेल शुद्ध सोन्याची हमी

Gold Hallmarking: पूर्वीच्या काळी सोन्याची शुद्धता प्रमाणित करणारी कोणतीही अधिकृत, सरकारमान्य अशी यंत्रणा नव्हती, त्यामुळे सोन्याचांदीचा व्यापार करणारे व्यापारी अर्थात सराफ व्यावसायिक शुद्धतेबाबत जे सांगत असत तेच ग्राह्य धरले जात असे

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 15 एप्रिल: भारतीय समाजात सोनं (Gold) हा केवळ धातू नाही, तर त्याला  एक भावनिक मूल्य आहे. भारतात सोनेखरेदी शुभ मानली जाते. लोक सणासुदीला, शुभमुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी करण्यावर भर देतात. त्यामुळे भारतात सोन्याची मागणी प्रचंड असते. सोने आयातीत (Gold Import) भारत एक आघाडीचा देश आहे. दरवर्षी देशात 700 ते 800 टन सोन्याची आयात होते. पूर्वीच्या काळी सोन्याची शुद्धता प्रमाणित करणारी कोणतीही अधिकृत, सरकारमान्य अशी यंत्रणा नव्हती, त्यामुळे सोन्याचांदीचा व्यापार करणारे व्यापारी अर्थात सराफ व्यावसायिक शुद्धतेबाबत जे सांगत असत तेच ग्राह्य धरले जात असे. मात्र त्यामुळे फसवणूकही होत असे. हे लक्षात घेऊन सरकारनं ग्राहकहिताच्या दृष्टीनं सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता मापन करणारी हॉलमार्किंग (Hallmarking)ही प्रमाणीकरण यंत्रणा काही वर्षांपूर्वी आणली. सराफ व्यावसायिक ग्राहकांना विकत असलेल्या प्रत्येक दागिन्याचं हॉलमार्किंग केलेलं असावं अशी सूचना सरकारने केली. त्यामुळं ग्राहकांना आपण घेतलेल्या सोन्याच्या दागिन्याची शुद्धता प्रमाणित असल्याची खात्री मिळू लागली. दागिन्यावर हॉलमार्क अर्थात एक संकेत चिन्ह आहे, याचा अर्थ ज्या कॅरेटचे सोने घेतले आहे, तितकी त्याची शुद्धता प्रमाणित आहे, हे स्पष्ट असे. मात्र तेव्हा सराफ व्यावसायिकांसाठी हॉलमार्किंग हे ऐच्छिक होते. (हे वाचा- Gold Price: लग्नसराईच्या काळात खरेदी करा स्वस्त सोनं, 10000 रुपयांनी कोसळले दर ) नोव्हेंबर 2019 मध्ये सरकारनं सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी 15 जानेवारी 2021 पासून हॉलमार्किंग अनिवार्य केलंजाईल, असं जाहीर केलं. मात्र कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) ही मुदत एक जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली. सरकारनं सराफ व्यावसायिकांना हॉलमार्किंगची तयारी करण्यासाठी आणि भारतीय मानक ब्युरोमध्ये (BIS) नोंदणी करण्यासाठी दीड वर्षापेक्षा अधिक वेळ दिला आहे. त्यामुळे ही मुदत आणखी वाढवण्यास सरकारनं स्पष्ट नकार दिला असून, लवकरात लवकर सराफ व्यावसायिकांनी भारतीय मानक ब्युरोमध्ये (BIS) नोंदणी करावी असं आवाहन केलं आहे. हॉलमार्क (Hall Mark)अनिवार्य झाल्यानंतर एक जूननंतर देशभरातील दागिन्यांच्या बाजारपेठेत केवळ हॉलमार्क असलेले 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातील. यामुळं ग्राहकांची फसवणूक टळेल. त्यांना शुद्ध सोन्याचे दागिने मिळतील. (हे वाचा- GOOD NEWS! तुमचा पगार 10% टक्के वाढणार; लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ) ग्राहक व्यवहार सचिव लीना नंदन म्हणाल्या की, भारतीय मानक ब्युरो सध्या सराफ व्यावसायिकांच्या हॉलमार्किंग नोंदणीला मंजुरी देण्यात व्यस्त आहे. भारतीय मानक ब्युरोचे संचालक प्रमोद कुमार तिवारी म्हणाले की,आम्ही एक जून 2021 पासून हॉलमार्किंग अनिवार्य करण्यास सज्जआहोत. याची मुदत वाढविण्याबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आतापर्यंत देशातील 35 हजारांहून अधिक सराफ व्यावसायिकांनी नोंदणी केली असून, पुढील एक-दोन महिन्यांत हाआकडा एक लाखांवर जाईल, अशी अपेक्षा आहे.’

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात