मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Diesel Price Hike : निवडणुकांनंतर आता पेट्रेल-डिझेल दर 6 रुपयांपर्यंत वाढवणार? काय आहे कारण

Petrol Diesel Price Hike : निवडणुकांनंतर आता पेट्रेल-डिझेल दर 6 रुपयांपर्यंत वाढवणार? काय आहे कारण

अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या कंपन्या येत्या काही दिवसांत प्रतिलीटर 6 रुपयांनी दर वाढवू शकतात.

अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या कंपन्या येत्या काही दिवसांत प्रतिलीटर 6 रुपयांनी दर वाढवू शकतात.

अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या कंपन्या येत्या काही दिवसांत प्रतिलीटर 6 रुपयांनी दर वाढवू शकतात.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 8 मार्च : उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका सोमवारी (Assembly Election in Five State) संपल्या. आता अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या कंपन्या येत्या काही दिवसांत प्रतिलीटर 6 रुपयांनी दर वाढवू (Petrol Diesel Price Hike) शकतात. संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार हळूहळू तेल कंपन्यांना प्रति लीटर 5 ते 6 रुपयांनी दर वाढवण्याची परवानगी देऊ शकते.

सोमवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचली (Crude Oil) होती. ही वाढ 2008 नंतरची सर्वोच्च वाढ आहे. कच्च्या तेलाच्या सतत वाढत असलेल्या किमतींमुळे कंपन्यांवरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा दबाव होता. त्यामुळे त्यांना प्रतिलिटर 12 रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता.

उत्पादन शुल्क किंवा इतर कोणताही टॅक्स कमी करण्याबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या वाढत्या पातळीवर अधिक काळ राहिल्यास केंद्र आणि राज्य सरकार मिळून करात सूट देऊ शकतात. वाढलेल्या किमतीचा काही भाग पेट्रोलियम कंपन्यांनाही सहन करावा लागेल, जेणेकरुन ग्राहकांवर महागड्या इंधनाचा भार पडू नये.

हे वाचा - तुमच्याकडेही एकापेक्षा जास्त Credit Card आहेत का? याचे फायदे काय आणि तोटे काय?

तेल कंपन्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत किमती वाढण्याची पाहू शकतात. 10 मार्चनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज बदल होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मागील नोव्हेंबरपासून इंधन दर स्थिर आहे. नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लीटरने कमी केलं होतं.

हे वाचा - Pan Card धारकांनो, 1 एप्रिलपर्यंत करा हे काम, अन्यथा होईल 10 हजारांचा दंड!

देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीवर क्रूड आणि रुपयाचा सर्वाधिक परिणाम होतो. विदेशी चलन बाजारात रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे कंपन्यांना क्रूड खरेदी करणं अधिक महाग झालं आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीमुळे किरकोळ किमतीत वाढ करण्याचा दबाव वाढतो आहे. त्यामुळे लवकरच 5 ते 6 रुपयांची वाढ पाहायला मिळू शकते.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel price, Petrol price, Petrol price hike