जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमच्याकडेही एकापेक्षा जास्त Credit Card आहेत का? याचे फायदे काय आणि तोटे काय?

तुमच्याकडेही एकापेक्षा जास्त Credit Card आहेत का? याचे फायदे काय आणि तोटे काय?

तुमच्याकडेही एकापेक्षा जास्त Credit Card आहेत का? याचे फायदे काय आणि तोटे काय?

क्रेडिट कार्ड्स ठेवण्याची निश्चित संख्या नाही. जर तुम्ही एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड योग्यरित्या मॅनेज केले नाही तर 2 क्रेडिट कार्डे असणे देखील तुम्हाला खूप महागात पडू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 मार्च : जास्त क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर केल्‍याने तुमच्‍या एका कार्डवरील युटिलायझेशन रेश्यो कमी होऊ शकते, असं इन्व्हेस्टोपीडियाच्या संशोधनात समोर आलं आहे. झी बिझनेस ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. क्रेडिट कार्ड्स ठेवण्याची निश्चित संख्या नाही. जर तुम्ही एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड योग्यरित्या मॅनेज केले नाही तर 2 क्रेडिट कार्डे असणे देखील तुम्हाला खूप महागात पडू शकते. पण दुसरीकडे, जर तुम्ही त्यांचा योग्य वापर करत असाल तर अनेक कार्डे असणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कसे ते जाणून घेऊया. एकहून अधिक क्रेडिट कार्डचे फायदे युटिलायझेशन रेशो / क्रेडिट स्कोअरमध्ये फायदा अधिक क्रेडिट कार्डचा फायदा असा आहे की वेळेवर पेमेंट केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो. तसेच, एकाच क्रेडिट कार्डवरील वापराचे प्रमाणही कमी आहे. जे क्रेडिट स्कोअर वाढवते. Post Office Scheme: FD पेक्षा जास्त व्याजदर आणि सुरक्षेची हमी, गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या दमदार योजना बॅलेन्स ट्रान्सफर सुविधा एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा फायदा असा आहे की जर काही कारणास्तव तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकत नसाल, तर तुम्ही दुसऱ्या क्रेडिट कार्डने पैसे भरू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी आणखी एक सायकल (सुमारे एक महिना) मिळेल. हाय लिमिटचा फायदा अधिक कार्डे तुम्हाला अधिक लिमिट देतात. अशा प्रकारे, ही क्रेडिट कार्डे आर्थिक संकटाच्या परिस्थितीत तुमची मदत करू शकतात. ATM मधून पैसे काढताना Green Light कडे लक्ष द्या, अन्यथा रिकामं होईल बँक अकाउंट खरेदीच्या वेळी पर्याय ऑनलाइन खरेदीच्या वेळी क्रेडिट कार्डधारकांना विविध प्रकारचे फायदे दिले जातात. अशा परिस्थितीत अनेक बँका ऑफर देतात आणि अनेक बँकांचे कार्ड तुम्हाला या ऑफर देत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे जास्त क्रेडिट कार्ड असतील तर तुमच्याकडे अधिक पर्याय तयार होतात. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचे तोटे जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचा खर्चही वाढू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही आणखी कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. तसेच त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही तितकाच वाईट परिणाम होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात