Home /News /money /

आर्थिक संकट कधीही येऊ शकतं, योग्य गुंतवणूक केल्यास अडचणीच्या काळात रडत बसावं लागणार नाही, कसं कराल प्लानिंग?

आर्थिक संकट कधीही येऊ शकतं, योग्य गुंतवणूक केल्यास अडचणीच्या काळात रडत बसावं लागणार नाही, कसं कराल प्लानिंग?

अचानक येणाऱ्या संकटांतून बाहेर पडण्यासाठी इमर्जन्सी फंड उपयुक्त ठरतो. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे तर अशा प्रकारच्या इमर्जन्सी फंडचं महत्त्व अधिकच वाढलं आहे.

    मुंबई, 28 मे : सर्वसामान्य माणसाचं महिन्याचं बजेट ठरलेलं असतं. एखादा खर्च अचानक उद्भवला तर ते बजेट कोलमडतं. अनेकदा अशी काही संकटं येतात. मग त्या वेळेस खर्च भागवायचा कुठून असा प्रश्न पडतो. ऐन वेळी धावाधाव करावी लागते किंवा कुणाकडून तरी कर्ज घ्यावं लागतं; पण अशा आपत्कालीन परिस्थितीला (Emergency Situation) सामोरं जाण्यासाठी पूर्वतयारी करून ठेवलेली कधीही चांगली. त्यासाठीच इमर्जन्सी फंडचा (Emergency Fund) पर्याय तज्ज्ञ सूचवतात. फायनान्शियल एक्सप्रेसने याबद्दलची अधिक माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. शेअर मार्केटमध्ये नुकसान (Loss In Share Market), मेडिकल इमर्जन्सी (Medical Emergency), नोकरी जाणं (Loss Of Job) अशा अचानक येणाऱ्या संकटांतून बाहेर पडण्यासाठी इमर्जन्सी फंड उपयुक्त ठरतो. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे तर अशा प्रकारच्या इमर्जन्सी फंडचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. सध्याच्या परिस्थितीत इमर्जन्सी फंड अत्यंत महत्त्वाचा आहे असं PGIM इंडिया म्युच्युअल फंडचे सीईओ अजित मेनन यांचं मत आहे. आपत्कालीन परिस्थितीत तर याचा उपयोग होतोच; पण आपल्याकडे अचानक आलेल्या संकटांसाठी आर्थिक तरतूद आहे या विचाराने आत्मविश्वासही वाढतो. त्यामुळे आपण टेन्शन-फ्री होतो; मात्र मार्केटमधली परिस्थिती लक्षात घेऊन सल्लागारांच्या सल्ल्यानेच इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. सेफ अ‍ॅसेट क्लासमध्येच (Safe Asset Class) गुंतवणूक करून इमर्जन्सी फंड तयार करावा, रिटर्न बाजारात असलेल्या जोखमीवर तयार करू नये असा सल्लाही मेनन देतात. बँक खातं वापरात नसेल तर लवकर बंद करा, अन्यथा होईल नुकसान; फसवणुकीचाही धोका शॉर्ट टर्म बँक FD (Short Term FD) अनेक बँका 1 वर्ष किंवा त्याहीपेक्षा कमी कालावधीसाठी एफडी करण्याचा पर्याय देतात. अनेक बँकांमध्ये एफडीची कमीत कमी रक्कम 1000 रुपयांपासून सुरू होते. एफडीसाठी रकमेची कमाल मर्यादा कितीही असू शकते. ओव्हरनाइट फंड (Overnight Fund) हा एक डेट फंड (Debt Fund) आहे. यामध्ये एका दिवसात मॅच्युअर होणाऱ्या बाँडमध्ये (Bond Matures In One Day) गुंतवणूक केली जाते. रोज मार्केट सुरू होताना बाँड खरेदी केले जातात. हे बाँड दुसऱ्या दिवशी मॅच्युअर होतात. ज्यांना सुरक्षित रिटर्न्स हवे आहेत त्यांच्यासाठी ओव्हरनाइट फंड (Overnight Fund) हा एक उत्तम पर्याय मानला जातो. याची मॅच्युरिटी एक दिवसाची असते. एकाच दिवसात मॅच्युअर होत असल्याने 100 टक्के रक्कम कोलॅटरलाइज्ड बॉरोइंग (Collateralized Borrowing) आणि लेंडिंग ऑब्लिगेशन मार्केटमध्ये (Lending Obligation Market) गुंतवली जाते. त्यामुळे रिस्क कमी होते. अर्थात एकाच दिवसात मॅच्युरिटी होत असल्याने त्याचे रिटर्न्सही कमी (Low Returns) मिळतात. आर्बिट्रॉज फंड (Arbitrage Fund) कॅश मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमधल्या (Cash And Derivative Market) शेअर्सच्या भावातल्या फरकाचा फायदा घेण्यासाठी या फंडचा उपयोग केला जातो. ही म्युच्युअल फंडची स्कीम असून कॅश सेगमेंटची शेअर्समध्ये खरेदी केली जाते आणि त्याचबरोबर त्या कंपनीच्या डेरिव्हेटिव्ह सेगमेंट्सची फ्युचर विक्री केली जाते. जेव्हा फ्युचर ट्रेड (Future Trade) योग्य प्रीमियमवर विकले जातात तेव्हाच ही विक्री होते. त्यामुळेच शेअर मार्केटमध्ये जास्त चढ-उतार असेल तेव्हा या फंडचा परफॉर्मन्स चांगला असतो. फंड मॅनेजर इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये त्या व्यवहाराला हेज केलं जातं. त्यामुळे कॅश मार्केटमध्ये खरेदी केलेल्या शेअर्सवर रिस्क बऱ्यापैकी कमी होते. Multibagger Share: गुंतवणूकदारांचे पैसे 'या' शेअरमुळे महिनाभरात दुप्पट, तुमच्याकडे आहे का हा शेअर? रिकरिंग डिपॉझिट (RD) सध्या पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर (RD) वार्षिक 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. विविध बँकांमध्ये 5 ते 6 टक्क्यांदरम्यान व्याज दिलं जातं. एक वर्षापर्यंच्या कालावधीच्या आरडीची मुदत 10 वर्षांपर्यंतही वाढवली जाऊ शकते. तुमचे पैसे कुठे गुंतवाल? (Where To Invest) इमर्जन्सी फंड म्हणजे पैशांची अशा ठिकाणी गुंतवणूक करा, जिथे पैसे दीर्घकाळापर्यंत ब्लॉक होणार नाहीत, असं BPN फिनकॅपचे संचालक ए. के. निगम यांचं म्हणणं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आवश्यकता भासल्यास लिक्विडीटीची समस्या उद्भवणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. अर्थात प्रत्येकाने आपल्या आर्थिक क्षमतेनुसारच इमर्जन्सी फंडात किती पैसे ठेवायचे त्याबद्दल विचार केला पाहिजे. कोविडमुळे (Covid) जगभरातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अजूनही पूर्वपदावर आलेल्या नाहीत. अनेकांचे उद्योग-व्यवसाय बुडाले, अनेकांच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाले आहेत. कॅपिटल मार्केटमध्येही अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत इमर्जन्सी फंडाचं महत्त्व अधिक वाढलं आहे, असंही निगम यांचं मत आहे. यासाठी आर्बिट्रॉज फंड, बँकेच्या शॉर्ट टर्म फंड एफडींबरोबरच बँकेत काही कॅश म्हणजेच रोख रक्कमही ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. डेट फंडांच्या बहुतेकशा कॅटेगरीजपासून सध्या दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
    First published:

    Tags: Investment, Money

    पुढील बातम्या